नवी दिल्ली – भाजपच्या विरोधातील विरोधी पक्षांची कोणतीही आघाडी कॉंग्रेसच्या सहभागाशिवाय शक्य होणार नाही असे कॉंग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची आघाडी झाली तर त्यात कॉंग्रेसची मध्यवर्ती भूमिका असेल असेही त्यांनी म्हटले आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत रमेश म्हणाले की, या सर्व गोष्टींबद्दल आत्ताच बोलणे खूप घाईचे आहे कारण कॉंग्रेसचे पहिले प्राधान्य हे कर्नाटकातील आगामी निवडणुका आणि या वर्षीच्या अन्य राज्यातील निवडणुका यांना आहे.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेस आणि उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष या दोन्ही पक्षांनी कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांपासून दूर राहण्याची भूमिका घेतली आहे, त्या विषयी विचारले असता रमेश म्हणाले की, टीएमसी, समाजवादी, लोक भेटत राहतात, तिसरी आघाडी, चौथी आघाडी तयार होत राहील, परंतु विरोधी आघाडीत कॉंग्रेस असणे आवश्यक आहे.”
आधी कर्नाटकात निवडणुका आहेत, त्यानंतर तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोराममध्ये निवडणुका आहेत.यावर्षी, आम्ही या राज्यांच्या निवडणुकांमध्ये पूर्णपणे व्यस्त आहोत, त्यामुळे आम्ही 2024 च्या निवडणुकीतील आघाडीच्या विषयाकडे नंतर पाहू, असे ते म्हणाले. सध्या बैठका सुरूच राहतील, पोझिशनिंग सुरूच राहील’ मी तिसरी आघाडी बनवीन, मी चौथी आघाडी बनवीन, मी पाचवी आघाडी बनवीन हे सर्व सुरूच राहील,” असेही ते म्हणाले. आमचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि वरिष्ठ नेते 2024 च्या निवडणुकांबाबत अन्य पक्षांशी चर्चा करून रणनीती तयार करतील असेही त्यांनी नमूद केले.
Elections 2024 : विधानसभेच्या जागा वाटपाबाबत बावनकुळे यांचे घुमजाव, म्हणाले “अजून जागा…”
अदानी मुद्द्यावर विरोधकांच्या निदर्शनापासून टीएमसी दूर राहिल्याने आणि राष्ट्रवादीने पाठिंबा न दिल्याने विरोधकांच्या ऐक्याला तडा गेला का, असे विचारले असता ते म्हणाले, मला असे वाटत नाही. टीएमसीचे स्वतःचे तर्क असू शकतात, मला यापेक्षा जास्त काही बोलायचे नाही. अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याच्या मागणीवर 16 राजकीय पक्ष एकत्र आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाबतीत, ते शरीराने नव्हे तर आत्म्याने आमच्या बरोबर आहेत असेही त्यांनी नमूद केले.