Wimbledon 2023 : कोको गॉफला पराभवाचा धक्का

लंडन :- टेनिस जगतातील सर्वात मानाच्या समजल्या जात असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सनसनाटी निकालाची नोंद झाली. स्पर्धेतील मात्तबर खेळाडू व अमेरिकेची महिला टेनिसस्टार कोको गॉफला पराभवाचा सामना करावा लागला. तीला आपलीच देश सहकारी खेळाडू असलेल्या नवख्या सोफिया केनिनने पराभूत करत स्पर्धेतील तीचे आव्हानच संपुष्टात आणले.
महिला एकेरीच्या अन्य लढतीत अमेरिकेच्या कोको गॉफलाही पराभवाचा धक्का बसला. पहिल्याच फेरीत तिचे आव्हानही संपुष्टात आले. तिचा अमेरिकेच्याच सोफिया केनिनने 6-4, 4-6, 6-2 असा पराभव केला. चेक प्रजासत्ताकच्या मारिया बुझकोव्हाने पहिल्या फेरीत सिमोन वॉलट्रेटवर 6-1, 6-4 अशी मात केली.
चेक प्रजासत्ताकच्याच कॅतरीना सिंकोव्हाने चीनच्या क्विनवेन झेंगचा 6-4, 7-5 असा पराभव केला. रशियाच्या दारिया कस्तकीनाने अमेरिकेच्या शर्लीन दोलहिडेवर 6-1, 6-4 अशी मात केली. पुरुष एकेरीत नॉर्वेच्या कॅस्पर रुडने फ्रान्सच्या लॉरेंट लोकोलीचा 6-1, 5-7, 6-4, 6-3 असा पराभव केला.
स्पर्धेचा संभाव्य विजेता सर्बियाचा नोवाक जोकोवीचनेही अपेक्षित आगेकूच करताना पहिल्या फेरीत अर्जेन्टिनाच्या पेड्रो सॅशेनवर 6-3, 6-3, 7-6 अशी सरळ तीन सेटमध्ये मात केली.
व्हिनस विल्यम्सचे पुनरागमन अपयशी…
अमेरिकेची एकेकाळची अव्वल महिला टेनिसपटू व्हिनस विल्यम्स हीने वयाच्या 43 व्या वर्षी या स्पर्धेत पुनरागमन केले होते. मात्र, तीला युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाकडून पराभवाचा सामना करावा लागला. स्वितोलिनाने व्हिनसवर 6-4, 6-3 अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली व दुसरी फेरी गाठली, तर व्हिनसला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. मात्र, तरीही तीचे जागतिक टोनिसमधील योगदान चाहते विसरले नव्हते व पराभवानंतर प्रेक्षकांना अभिवादन करत असलेल्या व्हिनसला याच प्रेक्षकांनी उभे राहून मानवंदना दिली.





