पुणे जिल्हा | दूध पावडर निर्मितीसाठी प्रयत्न करणार

अकलूज, (प्रतिनिधी) -राज्यात दूध उत्पादक शेतकरी सभासदांना सर्वाधिक दर देण्यासाठी शिवामृत दूध संघ प्रयत्नशील असून, दूध पावडर निर्मितीसाठीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती शिवामृत दूध उत्पादक संस्थेच चेअरमन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.
विजयनगर, अकलूज येथील शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
यावेळी व्हा. चेअरमन दत्तात्रय भिलारे, सहकार महर्षि कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालक हणमंत शिंदे, दूध संघाचे संचालक उद्धव जाधव, विजय नरूटे,
बाळासाो देशमुख, जगत्राथ जाधव, त्रिंबक इंगळे, सुरेश पिसे, सुभाष शिंदे, नारायण सालगुडे-पाटील, बाळासाहेब पराडे, संजय गोरे, माधुरी फडतरे, शारदा पिसे, संग्राम रणवरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हाईस चेअरमन दत्तात्रय भिलारे यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक रविराज इनामदार यांनी विषयाचे वाचन केले. त्यास उपस्थित सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.
यावेळी 2023-2024 सालात सर्वाधिक दूध पुरवठा करणार्या व सर्वाधिक पशुखाद्य खरेदी करणार्या संस्थाना खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये मळोली.
दूध व्यवसायिक संस्था व शिवामृत दूध संकलन केंद्र मानेवस्ती, कोंडबावी या संस्थानी चॅम्पियनशिप मिळवली. सर्वाधिक दूध पुरवठा करणार्या संस्थामध्ये छत्रपती दूध संस्था मांडवे (प्रथम),
सिद्धनाथ दूध संस्था तामसिदवाडी (द्वितीय, श्री. शंकर दूध संस्था सदाशिवनगर (तृतीय), सर्वाधिक दूध पुरवठा करणार्या संकलन सेंटरमध्ये शिवामृत दूध संकलन केंद्र,
माडवे (प्रथम), शिवामृत श्रावणी दूध संकलन केंद्र पिलीव (द्वितीय), शिवामृत दूध संकलन केंद्र इस्लामपूर (तृतीय), सर्वाधिक दूध पुरवठा व सर्वांत जादा दर घेणार्यामध्ये शिवामृत दूध संकलन केंद्र मोरोची (प्रथम), शिवामृत श्रीराम दूध संकलन केंद्र कारखेल (द्वितीय), शिवामृत दूध संकलन केंद्र करेवस्ती, सदाशिवनगर (तृतीय), यांचा सन्मान करणेत आला. आभार तज्ज्ञ संचालक हरिश्चंद्र मगर यांनी मानले.
सर्वाधिक खाद्य खरेदी केलेल्या संस्था
संकलनानुसार सर्वांत जादा पशुखाद्य खरेदी करणार्या संस्थामध्ये धर्मवीर सदाशिव दूध व्याव. सह संस्था वटपळी (प्रथम), शिवामृत दूध संकलन केंद्र लोणंद (प्रथम), शिवामृत दूध संकलन केंद्र गिरझणी (प्रथम), शिवामृत दूध संकलन केंद्र पिलीव (प्रथम), दत्तप्रताप दूध व्याव. सह. संस्था डोंगरवाडी लोणंद या संस्थांचा गौरव करण्यात आला.





