Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यात एकत्र दिसणार? अखेर उद्धव ठाकरेंनी मनसेच्या युतीबाबत स्पष्टचं सांगितलं थेट म्हणाले…

Uddhav Thackeray : गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंची राजकीय युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा होत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठींचे सत्र वाढलेले आहे. ठाकरेसेना आणि मनसेच्या नेत्यांनी दोन्ही भाऊ राजकीय दृष्ट्या एकत्र आले तरी हरकत नसल्याचं म्हटलं आहे.
अशातच भेटीगाठीच्या दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत थेट बातमीच देतो अशी घोषणा केली होती. त्यानंतर दोन्ही भाऊ तब्बल १८ वर्षांनंतर एका व्यासपीठावर दिसले. आता घेतलेल्या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या मनसेच्या युतीबाबत सूचक विधान केलं आहे.
मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवास्थानी गेले होते. दोघांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली होती. त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता मी नाही गेलो किंवा गेलो तरी चर्चा होते. नेमकी अडचण माझ्या लक्षात येत नाही. मी गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरेंच्या घरी गेलो. माझ्या वाढदिवसाला ते इथे मातोश्रीवर आले होते. आम्ही किती मोदक खाल्ले याचीही माध्यमात चर्चा झाली. असं गंमतीत उद्धव ठाकरे म्हणाले.
दोन्ही भाऊ दसरा मेळाव्याच्या दिवशी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा होती. राज ठाकरे शिवसेनेच्या (ठाकरे) दसरा मेळाव्यात दिसणार का? असा प्रश्न त्यांना करण्यात आला. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ते येतील, पण माध्यमांनी जरा थांबावे…” यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरेंच्या घरी मागच्या आठवड्यात भेट देण्याचे कारण सांगताना ते म्हणाले, मावशी (राज ठाकरेंची आई) मला घरी येत रहा, असे मागच्या वेळी म्हणाली होती. त्यामुळे आमचे आता असेच येणे-जाणे सुरू आहे.
राज ठाकरेंशी अधिकृत युती कधी जाहीर करणार? असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर याची घोषणा करण्यात येईल. असं म्हणत जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणत हसत पत्रकार परिषद संपवली. यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याचं निश्चित झालं आहे.
“मोदींच्या मनात पाप जरी असले तरी….”
या पत्रकार परिषदेच्या अगोदर मातोश्रीवर धाराशिवच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस असून उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी माझे कुणी दुश्मन नाही. मी त्यांना माझं दुश्मन मानतच नाही. मोदी जरी मला दुश्मन मानत असले तरी, मी त्यांना दुश्मन मानत नाही. ते ज्या पद्धतीनं शिवसेना संपवायला निघाले आहेत, हे कुणीही राजकारणी सहन करू शकत नाही. मोदींच्या मनात पाप जरी असले तरी, मी त्यांना शुभेच्छा देतो.
हेही वाचा : महाराष्ट्रात ७९ शेतकरी भवन उभारणार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय





