Sanjay Raut | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. काही वेळानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील राष्ट्रपतींची भेट घेतली. एकाच वेळी अचानक दोन मोठ्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावेळी महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे देखील म्हंटले जात आहे. या भेटींवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सप्टेंबर महिन्यात देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात, असा दावा केला आहे. संजय राऊत म्हणाले की, “राष्ट्रपतींना पंतप्रधान भेटणे हा त्यांच्या कामाचा एक भाग आहे. ते राष्ट्रपतींना भेटायला जातात हेच महत्त्वाचे आहे. राष्ट्रपतींना ते भेटायला बोलवत नाही, ही बातमी आहे. सध्या आपल्या देशात राष्ट्रपतींचे अधिकार काय आहेत? हे आपल्याला माहित आहे. राष्ट्रपतींच्या सल्ल्याने सरकार किती काम करते हे सुद्धा आपल्याला माहित आहे. या देशात सध्याच्या कामाची एकंदरीत परिस्थिती पाहता काहीही होऊ शकते,” असे देखील त्यांनी म्हटले आहे. “आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक महत्त्वाची बैठक आहे. त्या बैठकीत सुद्धा महत्त्वाच्या भविष्यातल्या घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. जे सातत्याने सांगितले जात आहे की, सप्टेंबर महिन्यात या देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील. आम्हालाही वाटतं की, सप्टेंबर महिन्यात या देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात,”असे सुचक विधान संजय राऊत यांनी केले आहे. Sanjay Raut | संजय राऊतांचे दुबेंना प्रत्युत्तर संजय राऊत यांनी निशिकांत दुबे यांच्या विधानाला देखील प्रत्युत्तर दिले आहे. “१०६ हुतात्मांच्या बलिदानातून ही मुंबई आपल्याला महाराष्ट्रासह मिळालेली आहे. ते १०६ हुतात्मे दुबे, चौबे, मिश्रा नाही, हे या निशिकांत दुबे यांनी समजून घेतलं पाहिजे. छातीचा कोट करुन महाराष्ट्र, मराठी माणूस, गिरणी कामगार लढला तेव्हा ही मुंबई मराठी माणसाला मिळाली. तुम्ही मुंबईत पैसे कमवायला, घाम गाळायला आला म्हणजे मुंबई ओरबडायला आला का, तुमच्या राज्यात नोकरी उद्योग धंदा नसल्याने मुंबईत आला. नाहीतर तुम्ही कशाला याल. मराठी माणसाच्या पोटावर मारुन तुम्ही ही मुंबई लुटत आहात, हे देखील तितकंच खरं आहे,” असेही संजय राऊतांनी सांगितले. Sanjay Raut | काय म्हणाले होते निशिकांत दुबे? “मुंबई, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उत्तरप्रदेश, बिहार आणि हिंदी भाषिक लोकांचे मोठे योगदान राहिले आहे. आजही आम्ही तितकेच योगदान देत आहोत,” असे वादग्रस्त विधान भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केले होते. Sanjay Raut | हेही वाचा : शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक ! सेन्सेक्स २४४ अंकांनी वाढला; निफ्टीनेही २४००० चा टप्पा ओलांडला