Sanjay Raut : “अमित शाह यांच्या राज्यातील सहा ते सात जणांना मंत्रिपदापासून वगळण्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना”; संजय राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut : पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोबाईलवरच रमीचा डाव मांडल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी एक्स अकाऊंटवरून सभागृहात कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच संजय राऊत यांनी मोठं विधान केले आहे. कोकाटे याचं मंत्रिपद जाणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. तसेच अमित शाह यांनी राज्यातील सहा ते सात जणांना मंत्रिपदापासून वगळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना केला असल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. सभागृहात रमी खेळतानाच्या घटना घडू नयेत, इथिकल कमिटीने याचा खुलासा करावा, असे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे, तर शेतकऱ्यांनी विसरा हमी खेळा रमी असे एक पोस्टर शेअर करत कॅप्शनमधून कोकटे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांनी निशाणा साधला आहे.
रोहित पवारांच्या पोस्टमुळे खळबळ…
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?
हेही वाचा : “ज्याला हिंदी शिकायची त्याने शिकावी, पण…”; अभिनेता स्वप्निल जोशीने व्यक्त केलं मत





