District Name Change : महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलणार? ‘या’ आमदाराची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी
District Name Change : औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर', उस्मानाबादचे 'धाराशिव' आणि अहमदनगरचे 'अहिल्यानगर' असे नामकरण झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलण्याची जोरदार मागणी समोर आली आहे.

District Name Change : महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी पुढे आली आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण झाल्यानंतर आता बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. (District Name Change)
बुलढाण्याला ‘राजमाता जिजाऊनगर’ नाव देण्याची मागणी
आमदार श्वेता महाले यांनी बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून ‘राजमाता जिजाऊनगर’ असे करण्याची मागणी केली आहे. राजमाता जिजाऊसाहेबांची जन्मभूमी असलेल्या सिंदखेड राजा परिसरामुळे बुलढाणा जिल्ह्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. त्यामुळे राजमाता जिजाऊंच्या स्मृतीला अभिवादन म्हणून जिल्ह्याचे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (District Name Change)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे आमदार महाले यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या मागणीवर सरकारकडून पुढे काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे. (District Name Change)
पत्रात नेमकं काय म्हटलं?
आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात बुलढाणा जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनस्थळांचा उल्लेख केला आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवर, शेगाव, मेहकर येथील श्री शारंगधर बालाजी मंदिर, ज्ञानगंगा अभयारण्य आणि सैलानी बाबा दर्गा यांसारख्या स्थळांमुळे बुलढाणा जिल्ह्याला विशेष ओळख मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. (District Name Change)
यासोबतच सिंदखेड राजा ही राजमाता जिजाऊसाहेबांची जन्मभूमी असल्याचा उल्लेख करत त्यांच्या ऐतिहासिक योगदानावरही त्यांनी भर दिला आहे. राजमाता जिजाऊसाहेब यांनी बाल शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची प्रेरणा रुजवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे महाले यांनी पत्रात म्हटले आहे. (District Name Change)
‘शिवप्रेमींच्या भावनांचा आदर व्हावा’
बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ केल्यास राजमाता जिजाऊसाहेबांच्या जन्मभूमीचा सन्मान होईल, तसेच देशभरातील शिवप्रेमींच्या भावनांचाही आदर होईल, असा दावा आमदार श्वेता महाले यांनी केला आहे. (District Name Change)
आमदार महाले यांनी हे पत्र सोशल मीडियावरही शेअर केले असून, राजमाता जिजाऊसाहेबांच्या जन्मभूमीचा सन्मान करण्यासाठी ही मागणी केल्याचे स्पष्ट केले आहे. आता बुलढाणा जिल्ह्याच्या नामकरणाची ही मागणी सरकार गांभीर्याने घेणार का? ‘राजमाता जिजाऊनगर’ या नावाला मंजुरी मिळणार का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (District Name Change)
Pune District : बदलीचे आदेश कागदावरच! पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांना कार्यमुक्त कधी करणार?





