Sanjay Raut : ठाकरेंचे खासदार फुटणार? गुप्त बैठकीच्या चर्चा; संजय राऊतांचा फडणवीसांचे नाव घेत जोरदार पलटवार म्हणाले..
Sanjay Raut : उबाठा गटाचे आठ खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याची चर्चा असून, यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत जोरदार टोला लगावला आहे.

Sanjay Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आठ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून त्यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींमुळे लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
मात्र, या वृत्ताला ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ठामपणे फेटाळून लावले आहे. “ठाकरेंना सोडून जाणाऱ्या खासदारांची जी कथित यादी समोर आली आहे, ती वाचून हसू आले. ही बातमी पूर्णपणे निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नाही,” असे संजय राऊतांनी स्पष्ट केले.
फडणवीस शिंदे गटाचे अॅापरेशन करत आहेत (Sanjay Raut)
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील आठ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यातच ठाण्यात गुप्त बैठक झाल्याचे वृत्त समोर आल्याने ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा चर्चेत आले आहे. यावर टोला लगावत राऊत म्हणाले, “ऑपरेशन एकदाच केलं जातं. वारंवार ऑपरेशन केलं जात असेल तर ती डेड बॉडी असते. त्यांच्या पक्षाची डेड बॉडी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे आणि सध्या फडणवीस शिंदे गटाचंच ऑपरेशन करत आहेत.”
राऊत पुढे म्हणाले, “शिवसेनेचे सर्व खासदार एकजुटीने ठाम आहेत. जी नावे या यादीत दाखवली आहेत ती हास्यास्पद आहे. उद्या माझं किंवा आदित्य ठाकरे यांचं नावही टाकतील. केवळ वातावरण तापवण्यासाठी आणि काहीतरी हालचाल सुरू असल्याचं दाखवण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत. ही पत्रकारिता चुकीची आहे.”
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी रात्री ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटातील काही खासदारांची गुप्त बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या बैठकीबाबत खासदार अरविंद सावंत आणि ओमराजे निंबाळकर यांनीही स्पष्ट नकार देत अशी कोणत्याही बैठकी झाले नसल्याचे सांगितले आहे.
शिंदेंसोबत गुप्त बैठक झाल्याची चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटातील काही खासदारांची गुप्त बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत उद्धव ठाकरेंचे आठ खासदार उपस्थित होते, अशी माहिती आहे. अरविंद सावंत आणि ओमराजे निंबाळकर यांनी अशी कोणतीही बैठक झाल्याचे फेटाळून लावली आहे.
या खासदारांची नावांची चर्चा
अरविंद सावंत
संजय पाटील
संजय देशमुख
नागेश पाटील
राजाराम वाकचुरे
ओम राजेनिंबाळकर
राजाभाऊ वाजे
संजय जाधव
हेही वाचा : Eknath Shinde : मोठा राजकीय भूंकप? ठाकरेंच्या 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा






