Eknath Shinde : राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी पुन्हा जोर धरला असून, ठाकरे गटातील खासदारांना फोडण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीकडून अधिकृत हिरवा कंदील नसल्याचे बोलले जात असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पडद्यामागे प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटातील काही खासदारांची गुप्त बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत उद्धव ठाकरेंचे आठ खासदार उपस्थित होते, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांचा ताफा मार्ग बदलून ठाण्यातील व्होल्टास परिसरात गेल्याचेही वृत्त आहे. रात्री उशिरा सुरू झालेली ही बैठक पहाटेपर्यंत चालल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. Eknath Shinde ठाकरे गटाकडून या बैठकीत अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि राजाभाऊ वाजे उपस्थित असल्याचे वृत्त आहे. तर ओमराजे निंबाळकर यांच्यासह आणखी दोन खासदार व्हिडीओ कॉलद्वारे सहभागी झाल्याची चर्चा आहे. या बैठकीत संबंधित खासदारांना शिंदे गटात येण्याची ऑफर देण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, या सर्व दाव्यांना ठाकरे गटातील काही खासदारांनी स्पष्ट नकार दिला आहे. अरविंद सावंत यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटात जाणार नसल्याचे ठामपणे सांगितले. तर ओमराजे निंबाळकर यांनीही अशी कोणतीही बैठक झाल्याचे फेटाळून लावत, “जर बैठक झाली असेल तर त्याचे पुरावे द्यावेत,” असे आव्हान दिले आहे. यावर शिंदेंच्या दोन मंत्र्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. (Eknath Shinde) शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाठ म्हणतात “अॅापरेशन करायची आमची जुनी सवय आहे. आम्ही अॅापरेशन सांगून करतो का? मागचं अॅापरेशन सांगून केलं का? अशी अॅापरेशन अघडपणे करायची नसतात. ज्यादिवशी शिकार टार्गेटमध्ये येईल त्या दिवशी एका दिवसातच अॅापरेशन संपलेलं असेल. ही वेळ तुम्हाला काही काळातच पाहायला मिळेल. थोडा दम धरा. एकानाथ शिंदे साहेब योग्यवेळेला टार्गेट पाहून फायर करत असतात.” असे सूचक वक्तव्य केले आहे. Eknath Shinde : मोठा राजकीय भूंकप? ठाकरेंच्या 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक झाल्याची चर्चा शिंदेसेनेचे दुसरे मंत्री प्रकाश आबिटकर म्हणतात “शिवसेनेत येणारे इन्कमिंगक बघतल तर आता कुठलीही निवडणूक नाही अनेक लोकं येत राहतील.” या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा अस्थिरतेचे संकेत मिळत असून, ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू झाली आहे. हेही वाचा : Mahesh Shinde : “शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक त्यामुळे…”; शिंदेंच्या आमदाराचं मोठं विधान