Jitendra Awhad : आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची थेट धमकी देण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Jitendra Awhad : मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असतानाच, आता राष्ट्रवादी(शप)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा कॉल आला आहे. घराच्या बाहेर उभा आहे, तुला ठोकून टाकेन, असा रविवार संध्याकाळी साडेचारच्या सुमारास कॉल करत अज्ञाताने धमकी दिली. (Jitendra Awhad)
आव्हाडांनी संबंधित धमकीच्या कॉलची तक्रार पोलिसांना दिली आहे. तसेच, संबंधित व्यक्तीचा व्हॉट्सअप मेसेजही आव्हाडांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. (Jitendra Awhad)
जितेंद्र आव्हाड यांनी एक मोबाईल नंबर शेअर करत, त्या इसमानी 2/3 वेळा मला फोन केला, भ्रमणध्वनीवर अर्वाच्या भाषेत बोलून मारण्याची धमकी दिली. तो इसम माझ्या घराच्या दरवाजावर उभा असल्याचे बोलत होता, असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले. (Jitendra Awhad)
विशेष म्हणजे, आव्हाड यांना फोन करुन धमकी दिल्यानंतर आव्हाडांचे कार्यकर्ते हेमंत वाणी यांनी संबंधित फोन नंबरवर कॉल केला, त्यावेळी त्यांना देखील मारण्याची धमकी त्या व्यक्तीने दिली. आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला पण गोळ्या घालेन, असे त्या व्यक्तीने म्हटले. (Jitendra Awhad)
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वी देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांना धमकी देण्यामागचे कारण काय आहे, अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी, अद्याप पोलिसांनी कुणालाही ताब्यात घेतल्याची माहिती नाही. (Jitendra Awhad)
Jitendra Awhad : लाडकी बहीण योजनेतून एक कोटी नावे कमी; जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर घणाघात





