Jitendra Awhad News : शासकीय विश्रामगृहात सहा दिवस महिलेवर सामूहिक अत्याचार; जितेंद्र आव्हाडांच्या दाव्याने खळबळ

Jitendra Awhad News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. 6 तारखेला एक सामूहिक अत्याचारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यातील काही आरोपी हे ६५ वर्षावरील आहेत.
त्यामध्ये एक प्राचार्यही आहे. या गुन्ह्यात शासकीय विश्रामगृहाचा वापर करून तिथे सहा दिवस सातत्याने त्या महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरला एक पोस्ट शेअर केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांचा दावा काय?
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘खरंतर हा गुन्हा नोंदविताना तेथील सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्वाचा पुरावा ठरतो. प्रत्येक शासकीय विश्रामगृहात शासनाच्या आदेशाने सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. या सीसीटीव्हीचे फुटेज न तपासता, केवळ राजकीय वैमनस्यातून लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम हा गुन्हा नोंदवून पोलिसांनी केलेले आहे.’, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
पुढे म्हणाले की, ‘माझे असे मत आहे की, पोलिसांचाही यामध्ये नाईलाज झाला आहे. कारण, सुरूवातीला पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला होता. मात्र, वरून दबाव आल्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला. यामध्ये अनेक बाबी अशा आहेत की त्या संशयास्पद आहेत.’, असं जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. उगाच गोरगरीबांचे चारित्र्यहनन करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम करू नये. उद्या यातून एखाद्याने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली तर यास जबाबदार कोण….? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
६ तारखेला एक सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यातील काही आरोपी हे ६५ वर्षावरील आहेत. त्यामध्ये एक प्राचार्यही आहे. या गुन्ह्य़ात शासकीय विश्रामगृहाचा वापर करून तिथे सहा दिवस सातत्याने त्या महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 13, 2025





