Jitendra Awhad : लाडकी बहीण योजनेतून एक कोटी नावे कमी; जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर घणाघात
Jitendra Awhad : राज्यातील लाडकी बहीण योजनेतून 92 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची नावे वगळण्यात आली आहेत.

Jitendra Awhad : राज्यातील लाडकी बहीण योजनेतून 92 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची नावे वगळण्यात आली आहेत. केवायसीसह विविध कारणांस्तव या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आल्याने त्यांना दरमहा मिळणारा दीड हजार रुपयांचा हफ्ता बंद झाला आहे. (Jitendra Awhad)
या निर्णयामुळे लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत असून, विरोधकांकडून सरकारवर टीकाही केली जात आहे. पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना सरकारने फसवल्याचे राष्ट्रवादी(सप) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. (Jitendra Awhad)
आव्हाड म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची कोअर कमिटी बैठक झाली. राज्यातील आणि देशातील प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली. महागाई वाढत आहे, पण याबाबत सरकार गंभीर नाही, याबाबत आमची चर्चा झाली. कर्जमाफी केल्याचे गवगवा करत आहेत. (Jitendra Awhad)
मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. तसेच, लाडकी बहीण योजनेंअंतर्गत 1 कोटी महिलांची नावे कमी केली आहेत. सरकारने या महिलांची फसवणूक यांनी केली आहे, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. (Jitendra Awhad)
तसेच, पेपर फुटीबाबत सरकार गंभीर नाही. आम्ही एमपीएससी पेपरफुटीबाबत आंदोलन करणार आहोत, देशात आणि महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत आहे. हाताला काम देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राच नाव होते. (Jitendra Awhad)
आता, हातातून काम काढून घेणारे राज्य अशी आपली ओळख होते आहे. SIR मध्ये रेशनकार्डला मान्यता मिळत नाही. फॉर्म नंबर 7 चा वापर करून अनेक नावे कमी केली जातील, असेही आव्हाड म्हणाले. (Jitendra Awhad)






