Will Jacks Statement : “भविष्यात हा ‘पब क्विझ’चा प्रश्न बनेल…!” १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला बाद करणाऱ्या विल जॅक्सच मोठं वक्तव्य
Will Jacks Statement : पहिल्याच सामन्यात वैभवला यष्टिचित करणाऱ्या इंग्लंडच्या विल जॅक्सने एका पॉडकास्टमध्ये वैभवबाबत एक अतिशय रंजक आणि मोठे विधान केले आहे.

Will Jacks Statement On Vaibhav Sooryavanshi IND vs ENG T20I Series : भारतीय क्रिकेटचा नवा उदयोन्मुख तारा आणि १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या इंग्लंड दौऱ्यावरील टी-२० मालिकेमुळे चर्चेत आला आहे. संजू सॅमसनच्या जागी संघात स्थान मिळवणाऱ्या वैभवला पहिल्या तीन आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे चमक दाखवता आलेली नाही. मात्र, तरीही त्याच्यातील प्रतिभेची चर्चा जगभर सुरू आहे. पहिल्याच सामन्यात त्याला यष्टिचित करणाऱ्या इंग्लंडच्या विल जॅक्सने एका पॉडकास्टमध्ये वैभवबाबत एक अतिशय रंजक आणि मोठे विधान केले आहे.
“लोक फक्त त्यालाच पाहण्यासाठी तिकिटे काढून येतात” –
विल जॅक्सने वैभवच्या लोकप्रियतेबद्दल सांगताना एका पॉडकास्टमध्ये म्हणाला, “या १५ वर्षांच्या मुलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाद करणारा पहिला गोलंदाज कोण? हा काही वर्षांनंतर लंडनमधील ‘पब क्विझ’चा (Pub Quiz) एक ऐतिहासिक प्रश्न बनेल. तसेच मॅनचेस्टरमध्ये जेव्हा टीम शीटवर त्याचे नाव आले, तेव्हा स्टेडियममधील प्रेक्षकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. असं वाटत होतं की तोच भारतीय संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे आणि लोक फक्त त्यालाच पाहण्यासाठी तिकिटे काढून आले आहेत.”
“हा २५ वर्षांचा असता तर जगात नंबर-१ असता!”
Will Jacks opens up on dismissing Vaibhav Sooryavanshi for the first time in international cricket
He said:
“That might be a pub quiz answer in a few years’ time. Yeah, he is the guy. Obviously, watching him in the IPL and being there and playing against him, he’s a… pic.twitter.com/XQ6kHa6KVY
— Cricket Hub (@Anurag9793) July 11, 2026
विल जॅक्सने पुढे म्हणाला, “आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा कुटणाऱ्या या मुलाचे वय जरी कमी असले, तरी क्रिकेट वर्तुळात सर्वजण म्हणत आहेत की, वैभव जर २५ वर्षांचा असता, तर सध्या तो जगातील टॉप खेळाडूंच्या यादीत असता. तो खेळपट्टीवर आल्यावर पहिल्याच चेंडूपासून प्रहार करतो, त्यामुळे त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना रणनीती सतत बदलावी लागते.”
संजू सॅमसनचा बळी, पण वैभव अद्याप शांत!
टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ ठरलेला संजू सॅमसन सलग ३ डावांत (एकूण ६ धावा) फ्लॉप ठरल्यानंतर निवडकर्त्यांनी मोठा निर्णय घेत १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला प्लेइंग ११ मध्ये आणले. आयपीएल, देशांतर्गत क्रिकेट आणि अंडर-१९ मध्ये धावांचा पाऊस पाडणारा हा डावखुरा फलंदाज आंतरराष्ट्रीय स्तरावर अजून तरी मोठी खेळी करू शकलेला नाही. त्याने ३ सामन्यांत एकूण ४२ धावा केल्या आहेत.
दुसरीकडे, भारतीय संघाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. आधी आयर्लंडविरुद्ध ०-२ आणि आता इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांच्या मालिकेत संघ ०-३ ने पिछाडीवर असून भारताने मालिका गमावली आहे. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडने भारताला द्विपक्षीय मालिकेत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे





