Gill Tendulkar Wimbledon : “आता तर नातं पक्कं समजायचं…?” विम्बल्डन सामन्यातील सचिन-गिलचा फोटो व्हायरल झाल्याने सर्वत्र एकच चर्चा
Gill Tendulkar Wimbledon : विम्बल्डनच्या रॉयल बॉक्समध्ये शुबमन गिल थेट क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांच्यासोबत बसलेला दिसला.

Shubman Gill Sachin Tendulkar Wimbledon 2026 Viral Photo Sara Tendulkar Relationship Rumours : भारतीय कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट संघाचा नवनियुक्त कर्णधार शुबमन गिल सध्या इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेच्या तयारीत व्यस्त आहे. १४ जुलैपासून सुरू होणाऱ्या या मालिकेपूर्वी शुबमन गिलने आपला मोकळा वेळ लंडनच्या जगप्रसिद्ध विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिप पाहण्यात घालवला.
मात्र, या सामन्यापेक्षाही जास्त चर्चा तिथे घडलेल्या एका खास प्रसंगाची होत आहे. विम्बल्डनच्या रॉयल बॉक्समध्ये शुबमन गिल थेट क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांच्यासोबत बसलेला दिसला. हा फोटो समोर येताच सोशल मीडियावर फॅन्सनी “आता तर नातं पक्कं समजायंच?” अशा कमेंट्सचा पूर आणला आहे.
विम्बल्डनमध्ये गिलचा स्टायलिश लूक अन् सोशल मीडियावरील कमेंट्सचा पूर –
Rishta pakka samjhe?
— Kp_speaks (@kp_speaks33) July 10, 2026
शुबमन गिलने विम्बल्डनमध्ये अत्यंत डॅशिंग आणि स्टायलिश अंदाजात एन्ट्री घेतली. त्याने हलक्या तपकिरी रंगाचा ब्लेझर, निळा शर्ट, टाय आणि काळा चष्मा परिधान केला होता. दुसरीकडे, सचिन तेंडुलकर नेव्ही ब्लू सूटमध्ये तर अंजली तेंडुलकर ऑलिव्ह ग्रीन ड्रेसमध्ये उपस्थित होत्या. शुबमनचे नाव बऱ्याच काळापासून सचिनची मुलगी सारा तेंडुलकरशी जोडले जात असल्याने, युझर्सनी या फोटोवर मजेशीर कमेंट्स करायला सुरुवात केली.
Damad aur saas sasur ek sath 😂😂😂
— Harshit 🇮🇳 (@krharshit771) July 10, 2026
अनेकांनी “सासू-सासरा अन् जावयाची जोडी भारी दिसत आहे,” तर काहींनी “घरातून परवानगी मिळाली आहे,” अशा कमेंट्स करून दोघांच्या कथित नात्याच्या अफवांना पुन्हा हवा दिली आहे. विशेष म्हणजे, शुबमन किंवा साराने त्यांच्या नात्याबाबत कधीही जाहीर भाष्य केलेले नाही.
१४ जुलैपासून भारत-इंग्लंड वनडे मालिकेचा रंगणार थरार-
Seems like someone is ready for wedding bells
— Aressrana7 (@hitlernarco) July 10, 2026
मनोरंजनाचे हे क्षण संपवून शुबमन गिलला आता मैदानावर परतायचे आहे. १४ जुलैपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांच्या वन-डे मालिकेचा थरार रंगणार आहे. टी-२० मालिकेतील सुमार कामगिरीनंतर, एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ जोरदार पुनरागमन करेल अशी बीसीसीआयला अपेक्षा आहे. २०२७ च्या वन-डे वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांसारखे दिग्गज खेळाडूही मैदानावर पुनरागमन करताना दिसतील.





