‘पारदर्शकतेवर भर देणार’; तुहीन कांता पांड्ये यांनी सेबीच्या अध्यक्षपदाचा स्वीकारला कारभार

मुंबई – माजी वित्त आणि महसूल सचिव तुहीन कांता पांड्ये यांनी बाजार नियंत्रक सेबीचे अध्यक्ष म्हणून शनिवारी कारभार हाती घेतला. आतापर्यंत वित्त आणि महसूल म्हणून काम करणारे पांड्ये यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती गुरवारी सरकारद्वारे तीन वर्षांसाठी करण्यात आली होती.
माधवी पुरी बुच यांच्या जागी तुहीन कांता पांड्ये यांना नियुक्त केले आहे. माधवी यांचा अध्यक्षपदाचा 3 वर्षांचा कार्यकाळ शुक्रवारी संपला. पांड्ये आले तेव्हा माधवी तिथे उपस्थित नव्ह्त्या, यांनी आजरी असल्याचे सांगितले आहे. तुहीन कांता पांड्ये शनिवारी दुपारी बँड्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स येथिल सेबी मुख्यालयात पोहचले. सेबीचे चारही सदस्य अश्विनी भाटीया, अमरजीत सिंघ, अंनत नारायण आणि कमलेश वार्शने पांड्येच्या स्वागतासाठी सेबी मुख्यालयात हजर होते.
पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकाराशी बोलताना पांडे यांनी सांगितले की, सेबीचे अध्यक्ष म्हणून आपण पारदर्शकता वाढविण्यावर आणि या संस्थेत सांघिक कार्य संस्कृती वाढविण्यावर प्रयत्न करणार आहोत. पूर्वीच्या कामकाजात काय बदल केले जाणार आहेत असे पत्रकारांनी विचारले असता पांडे यांनी सांगितले की आपण कोणाच्याही कामकाजावर कसलीही प्रतिक्रिया देणार नाही. मात्र आपण सेबीच्या कामकाजात पारदर्शकता वाढवून आणि कर्मचार्यांना सोबत घेऊन काम करण्यावर भारत देऊ.
सेबी ही भारतातील अतिशय नामांकित संस्था असून अनेक अभ्यासू अधिकार्यांनी या संस्थेचे कामकाज वाढवले आहे. आपण या संस्थेची प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न करू असे पांडे म्हणाले. अगोदरच्याप्रमाणेच आपण विश्वास, पारदर्शकता, सांघीक काम आणि तंत्रज्ञान या आघाड्यावर भर देणार आहोत. सेबी ही जगातील सर्वात उत्तम बाजार नियंत्रक संस्था कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.
अगोदरच्या अध्यक्षावर आरोप
या अगोदरच्या सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच या कर्मचार्यांना सोबत घेऊन काम करत नव्हत्या असा आरोप केला जात होता. काही वेळा सेबीच्या कर्मचार्यांनी बुच यांच्या कामकाजाच्या पद्धती विरोधात नापसंती व्यक्त करून निवेदनही जाहीर केले होते. बूच यांच्या कामाच्या पद्धतीबाबत काही माध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी टीका केली होती





