MK Stalin : “भाषा आणि भूमीसाठी सतत संघर्ष करणार”; मुख्यमंत्री स्टॅलिन आक्रमक

M K Stalin । Tamil Nadu – तीन भाषा धोरणाविरुद्ध लढण्याची गरज आणि लोकसभा, विधानसभा मतदारसंघांचे सीमांकन यामुळे राज्यातील वातावरण अशांत होत चालले आहे. सीमांकन हा राज्याच्या स्वाभिमान, सामाजिक न्याय आणि लोककल्याणकारी योजनांशी संबंधित विषय आहे.
स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनाही याच मुद्द्यावर लढायचे असेल, तर दक्षिण भारतीयांनी करायचे तरी काययासा सवाल तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विचारला आहे. आपल्या ७२ व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला यासंदर्भातला एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
BJP leaders advocating Hindi insist, “You must know Hindi to buy tea, pani puri, or use toilets in North India.”
In the Age of AI, forcing any language as a third language in schools is unnecessary. Advanced translation technology already removes language barriers instantly.… pic.twitter.com/b5s5tpHuPZ
— M.K.Stalin (@mkstalin) February 28, 2025
आपले राज्य वाचवण्यासाठी लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. स्टॅलिन यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आणि म्हणाले की, केंद्राकडून होत असलेले भाषचे आक्रमण आणि सीमांकनाबाबतचा संदेश तुम्हाला सर्व लोकांपर्यंत पोहोचवावा लागेल, जेणेकरून राज्यातील प्रत्येक नागरिक राज्य वाचवण्यासाठी एकत्र येऊ शकेल.
द्रमुक हा अन्याय स्वीकारणार नाही आणि त्याविरुद्ध आवाज उठवेल. आमची मागणी स्पष्ट आहे की, संसदीय जागा लोकसंख्येच्या आधारावर निश्चित केल्या जाऊ नयेत. लोकसंख्या नियंत्रणासाठी दक्षिणेकडील राज्यांना दंड आकारला जाऊ नये. आपण शपथ घेतली पाहिजे की आपण तामिळनाडूच्या कल्याणाशी आणि भविष्याशी तडजोड करणार नाही.
राज्यांच्या हक्कांसाठीच्या या लढाईत आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. तामिळनाडू याला विरोध करेल आणि जिंकेल. कर्नाटक, पंजाब, तेलंगणा आणि इतर अनेक राज्यांमधूनही सीमांकनाबाबत आवाज उठवला जात असल्याचे स्टॅलिन म्हणाले.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सीमांकनाची प्रक्रिया २०२६ पासून सुरू होईल. जर लोकसंख्येच्या आधारावर सीमांकन केले गेले, तर दक्षिणेकडील राज्यांमधील लोकसभेच्या जागांची संख्या कमी होऊ शकते आणि उत्तरेकडील राज्यांमधील जागांची संख्या वाढू शकते. दक्षिणेकडील राज्ये याला विरोध करत आहेत.





