Akash More : काँग्रेस उमेदवारी अर्ज माघारी घेणार? दिल्लीत खलबंत; अंतिम निर्णयाकडे लक्ष
Akash More : बारामती पोटनिवडणुकीसाठी वेगवान हालचाली घडत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी मोठं विधान केले आहे.

Akash More : बारामती पोटनिवडणुकासाठी वेगवान राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस असल्याने मोठा निर्णायक दिवस असणार आहे. त्यानंतर या निवडणुकीसाठी किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट होईल. आतापर्यंत या निवडणुकीतून सहा जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यानुसार रिंगणात 47 उमेदवार आहेत.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यात जास्त चर्चा होत आहे ती काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवारीवरुन. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीची जागा रिक्त झाली. त्यामुळे इथे पोटनिवडणूक लागली आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर काँग्रेस उमेदवारी कायम ठेवण्यावर ठाम असल्याची माहिती आहे. Akash More
अर्ज माघारी घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. जर पक्षाकडून आदेश आला तर थांबणार असे ते म्हणाले आहेत. Akash More
सपकाळ साहेबांच्या माध्यमातून ते निर्णय घेतील त्यास आम्ही बांधील राहू. निवडणुकीतून माघार घेतली पाहिजे की लढलं पाहिजे या प्रश्नावर उत्तर देताना आकाश मोरे म्हणाले, मला बरचेशे लोकांचे फोन येताहेत. लढवलं पाहिजे, तुम्ही लढवय्या आहात.
पुढे ते म्हणाले काँग्रेस पक्षाचा मी शिस्तबस्त कार्यकर्ता आहे. पक्षाने थांबायला सांगितलं तर थांबणार. आमचा निर्णय ठरेल त्यानुसार आम्ही तुम्हाला कळवू असे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले आहे.
शरद पवारांच्या भेटीबाबत म्हणाले… (Akash More)
आकाश मोरे हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी गोविंद बाग येथे जाणार असल्याची माहिती समोर आली होती. यावर भाष्य करताना आकाश मोरे म्हणाले ज्यावेळी प्रचार सुरू होईल त्यावेळी त्यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन आशिवार्द नक्की घेऊ.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिल्लीत बैठक Akash More
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घ्यावी अशी विनंती सातत्याने केली जात आहे. आमदार रोहित पवार यांनी देखील प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची या पार्श्वभूमीवर भेट घेतली. आता दिल्लीत मोठी खलबंत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांची दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील बैठक सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा : Bihar By Elections 2026: बिहारमधील ‘या’ जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर ; १२ मे मतदान तर १४ मे ला मतमोजणी





