Anaya Bangar : अनाया बांगर बिग बॅासमध्ये झळकणार? शोचा होस्ट सलमान खानकडून अॅाफर मिळाल्याची चर्चा

Anaya Bangar : सध्या बिग बॅास १९ या नव्या सीझनची मोठी चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोमध्ये कोणते कलाकार स्पर्धेक म्हणून दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. अशातच आता या शोमध्ये जी स्पर्धेकांची यादी अंतिम करण्यात आली आहे. त्या यादीत अनाया बांगरचं नाव असल्याचं समोर आलं आहे. मात्र, अद्यापर्यंत अनायाच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तेब झालेला नाही. ‘बिग बॉस डॉट ताजा खबर’च्या ताज्या पोस्टनुसार बिग बॅास १९ च्या संभाव्य स्पर्धेकांच्या यादीमध्ये अनाया बांगरचं नाव असल्याचं समोर आलं आहे.
कोण आहे अनाया बांगर?
अनाया बांगर भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी आहे. ही एक ट्रान्सजेंडर महिला आहे. ती प्रोफेशनली एक अॅथलीट, ग्राफिक डिझायनर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. अनायाचं आधीचं नाव आर्यन बांगर असं होतं. मात्र, लिंग बदल करून आर्यनचा अनाया असा प्रवास झाला आहे. लिंग बदलण्यापूर्वी अनाया अंडर १६ क्रिकेटही खेळली आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तब्बल 4.23 लाख फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. यामुळे तिच्या लोकप्रियता पाहता तिला बिग बॅासच्या घरात तिला निमंत्रण देण्यात आलं आहे.
शोसाठी चाहते आतुर….
येत्या २४ अॅागस्टपासून बिग बॅास १९ या रियालिटी शोच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. यामुळे सध्या सर्वत्र या शोची मोठी चर्चा सुरू आहे. नव्या पर्वाचा टीझरही चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या नव्या पर्वात बिग बॅासच्या घरात कोणते कलाकार स्पर्धेक म्हणून दाखल होणार याची चर्चाही सुरू आहे. याशिवाय हा रियालिटी शो हॅाटस्टारवरही पाहायला मिळणार आहे. यंदाची बिग बॅासची थीम राजकारणावर आधारित असल्याची चर्चा असून, या शोसाठी चाहते आतुर झाले आहेत.
हेही वाचा : Police Officers Transfer : पोलिस दलात मोठा फेरबदल; बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?





