Anaya Bangar Gender Surgery : ५ वर्षांचा लढा अखेर यशस्वी! बापाची साथ अन् लेकीची जिद्द; लिंगबदल शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनायाने शेअर केली पोस्ट
Anaya Bangar Gender Surgery : संजय बांगर यांची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Anaya Bangar gender affirming surgery successfull : भारतीय क्रिकेटमधील दिग्गज व्यक्तिमत्व संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर हिने आपल्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर विजय मिळवला आहे. जेंडर-अफर्मिंग सर्जरी (लिंगबदल शस्त्रक्रिया) नंतर अनाया आता रिकव्हरीच्या टप्प्यात असून, तिने ही आनंदाची बातमी जगाला दिली आहे. “हा प्रवास सोपा नव्हता, पण आज मी स्वतःच्या खऱ्या ओळखीसोबत जगण्यासाठी सज्ज आहे,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
५ वर्षांची तयारी आणि आत्ममंथन
अनायाने स्पष्ट केले की, हा निर्णय अचानक घेतलेला नव्हता. गेली पाच वर्षे ती या शस्त्रक्रियेसाठी स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार करत होती. विविध थेरपी, वैद्यकीय चाचण्या आणि सखोल आत्ममंथनानंतर तिला जाणीव झाली की, जन्मजात मिळालेल्या लिंगाशी ती स्वतःला जोडू शकत नाही. स्वतःची खरी ओळख स्वीकारण्याच्या दिशेने हे तिचे सर्वात मोठे पाऊल ठरले आहे.
View this post on Instagram
वडील संजय बांगर यांचा भक्कम पाठिंबा –
View this post on Instagram
या संपूर्ण प्रवासात अनायासाठी सर्वात मोठी ताकद ठरले ते तिचे वडील संजय बांगर. अनायाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “हा प्रवास केवळ माझ्यासाठीच नाही, तर माझ्या कुटुंबासाठीही आव्हानात्मक होता. सुरुवातीला अनेक प्रश्न आणि भावनिक गोंधळ उडाला, पण वडिलांनी मला हळूहळू स्वीकारले. त्यांचा पाठिंबा मिळायला वेळ लागला, पण जेव्हा तो मिळाला, तेव्हा तो बिनशर्त आणि अतिशय मजबूत होता.”
समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश –
Backed by father Sanjay Bangar, Aryan has transitioned to Anaya Bangar following gender-affirming surgery (vaginoplasty) in Thailand.
"I don’t want to invade women’s cricket. I never felt aligned with the gender I was born with" – ANAYApic.twitter.com/cqCRetKFix https://t.co/X7nDg1hJvM
— News Algebra (@NewsAlgebraIND) March 18, 2026
अनाया बांगर केवळ क्रिकेटशी जोडलेली नसून ती ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांसाठी एक प्रखर आवाज बनली आहे. कुटुंबाचा पाठिंबा कोणत्याही ट्रान्स व्यक्तीसाठी किती महत्त्वाचा असतो, हे तिने आपल्या उदाहरणातून जगाला दाखवून दिले आहे. बदलाला वेळ लागतो, पण प्रेमाची आणि स्वीकृतीची किंमत सर्वात जास्त असते, असा सकारात्मक संदेश तिने दिला आहे.





