WI vs SA 2nd Test : मार्करम-व्हेरेनीची अर्धशतके, दुसऱ्या दिवसअखेर गयाना कसोटीवर द. आफ्रिकेची मजबूत पकड…

WI vs SA 2nd Test (Day 2 STUMPS) : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला, तर दुसरा सामना गयानाच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 17 विकेट पडल्या, तर दुसऱ्या दिवशी केवळ 8 विकेट पडल्या.
गयाना कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या डावात 5 गडी गमावून 223 धावा केल्या होत्या आणि त्यांची आघाडी 239 धावांपर्यंत वाढवली होती. त्याआधी दुसऱ्या दिवसाच्या खेळात वेस्ट इंडिज संघाला पहिल्या डावात 144 धावांपर्यंतच मजल मारता आली.
गयाना कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी दिसून आली, ज्यामध्ये एडन मॅक्रम आणि टोनी डीजॉर्ज या जोडीने पहिल्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. जॉर्जी 39 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर मार्करम 50 धावा करून बाद झाला. येथून वेस्ट इंडिज संघाच्या गोलंदाजांनी थोडी चांगली कामगिरी करत आफ्रिकेचा अर्धा संघ 139 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवला.
यानंतर काईल व्हेरेनी आणि अष्टपैलू व्हियान मुल्डर यांनी डावाची धुरा सांभाळत सहाव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाला आणखी धक्का बसू दिला नाही. व्हेरेनी 50 धावांवर नाबाद होता, तर मुल्डरनेही 34 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून जायडन सील्सने 3 तर गुडाकेश मोतीने 2 विकेट्स घेतल्या आहेत.
🟢🟡Day 2 | STUMPS
Great test match cricket once again on day 2!
🇿🇦South Africa 160/10 (1st Innings)
🏝️West Indies 144/10 (1st Innings)
🇿🇦South Africa 223/5 (2nd Innings)South Africa lead by 239 runs#WozaNawe #BePartOfIt#SAvWI pic.twitter.com/rGHrsdAa59
— Proteas Men (@ProteasMenCSA) August 16, 2024
वेस्टइडिंजचा पहिला डाव 144 धावांवर आटोपला..
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळात दक्षिण आफ्रिकेचा संघ 160 धावांवर गारद झाला होता, तर वेस्ट इंडिजनेही दिवसाचा खेळ संपला तेव्हा 97 धावा होईपर्यंत 7 विकेट गमावल्या होत्या. यानंतर दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिज संघाने 104 धावांवर आपली 9वी विकेटही गमावली होती. येथून जेसन होल्डर आणि शामर जोसेफ यांच्यात 10व्या विकेटसाठी 43 चेंडूत 40 धावांची भागीदारी पाहायला मिळाली आणि वेस्टइडिंजचा पहिला डाव 144 धावांवर आटोपला. होल्डरने नाबाद 54 धावांची खेळी केली तर जोसेफने 25 धावांचे योगदान दिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्या डावाच्या जोरावर फारशी आघाडी मिळवता आली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत पहिल्या डावात मुल्डरच्या चार बळींशिवाय नांद्रे बर्गरने 3 तर केशव महाराज याने 2 बळी घेतले. तर रबाडाला 1 विकेट मिळाली.
IND vs BAN : ‘टीम इंडियात पुनरागमनाची आशा नाही…’, संघ निवडीवर युवा फलंदाजाचे धक्कादायक विधान…
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव…
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 160 धावांवर संपुष्टात आला होता. यामध्ये एडन मार्करमने 14 धावा, टोनी डीजॉर्जने 1 धावा, ट्रिस्टन स्टब्सने 26 धावा, बेडिंगहॅमने 28 धावा, वारणेने 21 धावा आणि नांद्रे बर्गरने 23 धावा केल्या. डेन पिएड 38 धावा करून नाबाद राहिला. कर्णधार टेंबा बावुमा, वियान मुल्डर, केशव महाराज आणि कागिसो रबाडा यांना खातेही उघडता आले नाही. शामर जोसेफने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत पाच विकेट घेतल्या. याशिवाय जेडेन सील्सला तीन, जेसन होल्डर आणि गुडाकेश मोती यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.





