Vaibhav Sooryavanshi Prank : वैभव सूर्यवंशीची लहान चाहत्यांसोबत ‘मस्ती’! फोटोसाठी मागितले चक्क १००-१०० रुपये; राजस्थानने शेअर केला भन्नाट VIDEO
Vaibhav Sooryavanshi Prank : मैदानात आक्रमक दिसणारा वैभव खऱ्या आयुष्यात किती खेळकर आहे, याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.

Vaibhav Sooryavanshi Prank Video Viral : आयपीएल २०२६ मध्ये आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची झोप उडवणारा राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. मैदानात आक्रमक दिसणारा वैभव खऱ्या आयुष्यात किती खेळकर आहे, याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे, ज्यामध्ये वैभव विमानतळावर आपल्या चिमुकल्या चाहत्यांसोबत एक मजेशीर ‘प्रँक’ केला आहे.
नेमकं काय घडलं?
विमानतळावर दोन लहान मुले वैभवकडे फोटो सेल्फी घेण्यासाठी आली होती. तेव्हा वैभवने गंमतीने त्यांना म्हटले की, “भाई, मी फोटो काढण्याचे पैसे घेतो. खरं सांगतोय, एका फोटोसाठी १०० रुपये लागतील.” वैभवचे बोलणे ऐकून ती लहान मुलं क्षणभर अवाक् झाली, पण त्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली. ती मुलं तातडीने २०० रुपये घेऊन वैभवकडे परतली. मुलांचा हा प्रामाणिकपणा आणि निरागसपणा पाहून वैभवला हसू आवरले नाही. त्याने तात्काळ स्पष्ट केले की हा फक्त एक विनोद होता आणि त्यानंतर त्याने त्या मुलांसोबत आनंदाने सेल्फी काढले. राजस्थान रॉयल्सने याला ‘बच्चा पार्टी नेहमी एक पाऊल पुढे’ असे कॅप्शन दिले आहे.
Baccha party always a step ahead 😂 pic.twitter.com/locrozR0Yh
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 27, 2026
आयपीएल २०२६ मध्ये वैभवची ‘विराट’ कामगिरी –
वैभव सूर्यवंशी सध्या तुफान फॉर्ममध्ये असून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत ८ सामन्यांत ४४.६३ च्या सरासरीने आणि २३४.८७ च्या स्फोटक स्ट्राईक रेटने ३५७ धावा कुटल्या आहेत. यामध्ये ३१ चौकार आणि ३२ षटकारांचा समावेश आहे. नुकतेच हैदराबादविरुद्ध त्याने ३६ चेंडूंत झळकावलेले शतक हे आयपीएल इतिहासातील तिसरे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. आता २८ एप्रिलला पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात वैभव पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.
भव सूर्यवंशीच्या बाबबतीत आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचे क्रिकेट विश्लेषक नौमान नियाझ यांनी वैभवच्या खेळावर शंका उपस्थित करताना अत्यंत हास्यास्पद आणि विचित्र दावा केला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी दावा केला आहे की, वैभवच्या बॅटमध्ये एआय चिप आहे. ज्यामुळे त्याला फलंदाजीत मोठे शॉट मारण्यासाठी मदत होते.तसेच लॅबमध्ये त्याची टेस्ट करण्याची मागणी देखील केली आहे.





