Shubman Gill : गिलने उपकर्णधारपदानंतर संघातील स्थानही का गमावलं? अजित आगरकरांनी केलं स्पष्ट, पाहा VIDEO

Ajit Agarkar on Shubman Gill : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या रणसंग्रामासाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या १५ सदस्यीय संघातून सलामीवीर आणि उपकर्णधार शुबमन गिलला वगळण्यात आले आहे. ज्यामुळे बीसीसीआयच्या या निर्णयामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानंतर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी गिलला वगळण्याचे कारण सांगितले आहे.
उपकर्णधारपद गमावले अन् संघातूनही बाहेर –
काही काळापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शुबमन गिलकडे भारतीय टी-२० संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठीही तो संघाचा भाग होता. मात्र, वर्ल्ड कपच्या संघात त्याला स्थान न मिळाल्याने चाहते चकीत झाले आहेत. आता अजित आगरकर यांनी गिलला वगळण्यामागचे कारण स्पष्ट करताना त्याच्या फॉर्मवर बोट ठेवले आहे.
अजित आगरकर काय म्हणाले?
UC:
🗣️ “Combinations more than anything else”Why is #ShubmanGill not part of #TeamIndia’s squad for the ICC Men’s T20 World Cup 2026? #AjitAgarkar explains 👀
Watch Follow The Blues LIVE 👉 https://t.co/HCxHPl6kFs pic.twitter.com/mL5iQXQqzj
— Star Sports (@StarSportsIndia) December 20, 2025
गिलच्या निवडीबाबत बोलताना आगरकर म्हणाले, “शुबमन गिल हा किती दर्जेदार खेळाडू आहे यात शंकाच नाही. मात्र, सध्या त्याला धावा करण्यात अपयश येत आहे. दुर्दैवाने या टी-२० वर्ल्ड कपसाठी आम्ही त्याची निवड करू शकलो नाही. गेल्या वर्ल्ड कपलाही तो मुकला होता आणि आताही कामगिरीतील सातत्याअभावी हा निर्णय घ्यावा लागला.”
हेही वाचा – IND vs SA : भारताचा आफ्रिकेवर ‘विराट’ विजय! मालिका ३-१ ने खिशात; हार्दिक-तिलकसह वरुण ठरला विजयाचा शिल्पकार
धावांचा दुष्काळ आणि ‘फ्लॉप शो’ कायम –
🚨India’s squad for ICC Men’s T20 World Cup 2026 announced 🚨
Let’s cheer for the defending champions 💪#TeamIndia | #MenInBlue | #T20WorldCup pic.twitter.com/7CpjGh60vk
— BCCI (@BCCI) December 20, 2025
शुबमन गिलला संघातून वगळण्यामागे त्याची गेल्या १० सामन्यांतील कामगिरी मुख्य कारण ठरली आहे. त्याने मागील १० डावांत अनुक्रमे २४, ३७, ५, १५, ४६, २९, ४, ४, ० आणि २८ अशा धावा केल्या आहेत. यात एकही अर्धशतक नसल्याने आणि केवळ दोनदा ३० धावांचा टप्पा ओलांडल्याने निवड समितीने त्याच्याऐवजी इतर पर्यायांचा विचार केला.
टीम कॉम्बिनेशन ठरले निर्णायक –
गिलच्या फॉर्मसोबतच ‘टीम कॉम्बिनेशन’ देखील त्याच्या विरोधात गेले आहे. भारतीय संघाला अव्वल फळीत एका यष्टीरक्षक फलंदाजाची गरज होती. त्यामुळे संजू सॅमसन आणि इशान किशन यांना संधी देण्यात आली असून, अभिषेक शर्माच्या धडाकेबाज फॉर्ममुळे गिलला आपले स्थान गमवावे लागले आहे.
टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर आणि इशान किशन.





