जे मान्य होणार नाही, त्यासाठी हट्ट कशाला? भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्यांचे विधान

Chandrakant Patil : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आणि सगेसोयऱ्यांचा निकष लावून आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे यांची आहे. ही प्रमुख मागणी आणि अन्य मागण्या सरकारने मान्य कराव्यात, यासाठी मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर २९ अॅागस्टपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. त्यामुळे आज कोणत्या घडामोडी घडणार याची चर्चा होत आहे. या सगळ्यात भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांने मराठा आरक्षणासंदर्भात एक विधान केलं आहे.
जे मान्य होणार नाही, त्यासाठी हट्ट कशाला? असा सवाल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सांगलीमध्ये त्यांनी हे विधान केलं आहे. या संदर्भात एका वृत्तपत्राने वृत्त दिलं आहे. मनोज जरांगेच्या उपोषणाविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे विधान केलं आहे. दरम्यान, आजचा जरांगेंचा उपोषणाचा तिसरा दिवस असून हैद्राबाद, सातारा गॅझेट लागू करा, मराठा कुणबी एकच आहे असा जीआर काढा, अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मुंबईत हालचालींना वेग आला आहे. आज सरकारकडून कोणती पाऊल उचलली जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात व्यावहारिक मागण्या कराव्यात. ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत, त्यासाठी ते आंदोलनास बसले आहेत. व्यवहारिक मागण्या कराव्यात सरकार त्या मान्य करेल. पुढं पाटील म्हणाले, त्यांनी पूर्वी केलेल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. आंदोलनात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना दहा लाखांची नुकसानभरपाई तसेच वारसांना शासकीय नोकरीत घेतले आहे. फक्त यातून 9 जणांना वगळण्यात आले, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मुंबईला वेठूस धरू नये
मुंबईच्या आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक जमले आहेत. आंदोलक सीएसटी रेल्वे स्थानकात जिथे जागा मिळेल आसरा घेत आहेत. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. मात्र, आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रॅपिड अॅक्शन फोर्ससह मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला आहे. यावर बोलताना चोवीस तास चालणाऱ्या मुंबईला वेठूस धरू नये, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगेंना केलं आहे.
मध्यरात्री गुप्त बैठक





