Sharmila Shinde : ‘आय हेट माय फ्रेंड्स’ शर्मिला शिंदे असं का म्हणाली? शेअर केला खास फोटो
Sharmila Shinde : शर्मिला शिंदे झी मराठीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत 'निकिता' ही भूमिका साकारत आहे.

Sharmila Shinde : अभिनेत्री शर्मिला शिंदेने झी मराठी वाहिनीचा २०२६ मधील पुरस्कार सोहळ्यासाठी खास लुक केला होता. यंदाच्या नॉमिनेशन सोहळ्याची पिकनिक थीम होती. याकरिता तिने आकाशी आणि लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत. या फोटोत तिच्या हातात एक बास्केट दिसत असून, तिचा हा लूक लक्ष वेधून घेत आहे.
शर्मिलाने तिचा फोटो शेअर करत लिहिले, “या वर्षाची झी मराठी नॉमिनेशन पार्टीची थीम ‘Glam पिकनिक’ ही होती, म्हणून मी हँड बॅग म्हणून पिकनिक बास्केट घेऊन गेले तर माझ्या मित्र-मैत्रिणींनी त्यांचे फोन आणि पाऊच माझ्या बास्केटमध्ये ठेवायला दिले आणि माझ्या क्रिएटिव्हिटीचं मला ओझं केलं. आय हेट माय फ्रेंड्स (I hate my friends).” शर्मिलाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स करत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत, तर तर काहींनी तिच्या लूकचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
सध्या शर्मिला शिंदे झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत ‘निकिता’ ही भूमिका साकारत आहे. याशिवाय ती ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी’ या नाटकातही महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
शर्मिलाने ‘पुढचं पाऊल’, ‘नवरी मिळे हिटलरला’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. शर्मिलाने खलनायिका किंवा सकारात्मक भूमिकेतून वेळोवेळी आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. Sharmila Shinde
हेही वाचा:




