Radhika mukherji : अभिनेत्रीपेक्षाही कमी नाही गायक शानची पत्नी; ‘ते’ फोटो पाहून उडतील होश.!

आपल्या आवाजाने लाखो हृदयांची धडकन वाढवणाऱ्या शान यांच्या स्वतःच्या आयुष्यातील ‘स्पेशल’ व्यक्तीबद्दल फार कमी चर्चा होते. ती व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी 'राधिका मुखर्जी'.

Updated On:-6 फोटो
Photo 1
1 / 6

आणखी संबंधित फोटो

Radhika mukherji : नव्वदच्या दशकातील रोमँटिक गाण्यांचा विषय निघाला की उदित नारायण, कुमार सानू यांच्यासोबत एक नाव आवर्जून घेतलं जातं आणि ते म्हणजे गायक ‘शान’. आपल्या गोड, मधुर आणि रोमँटिक आवाजाने शान यांनी अनेक दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं.

Shaan-Radhika

Shaan-Radhika

‘तन्हा दिल’, ‘चाँद सिफारिश’, ‘जब से तेरे नैना’, ‘बहती हवा सा था वो’ यांसारख्या गाण्यांनी त्यांच्या आवाजाची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, आपल्या आवाजाने लाखो हृदयांची धडकन वाढवणाऱ्या शान यांच्या स्वतःच्या आयुष्यातील ‘स्पेशल’ व्यक्तीबद्दल फार कमी चर्चा होते. ती व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी ‘राधिका मुखर्जी’.

Shaan-Radhika

Shaan-Radhika

शान आणि राधिका यांचं नातं आजही सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतं. विशेष म्हणजे 2025 मध्ये या दोघांनी आपल्या लग्नाचा 25 वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी शान यांनी राधिकासाठी एक रोमँटिक पोस्ट शेअर करत, 25 वर्षं उलटूनही त्यांच्यासोबतचा प्रत्येक दिवस नव्यासारखा आणि सुंदर वाटत असल्याचं लिहिलं होतं. त्यांचा हा अंदाज पाहून चाहत्यांनीही या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला.

Shaan-Radhika

Shaan-Radhika

कोण आहेत शान यांच्या पत्नी राधिका?

शान यांच्या पत्नीचं नाव राधिका मुखर्जी असून त्या उद्योजिका आहेत. शानप्रमाणे त्या कायम लाइमलाइटमध्ये नसल्या तरी या जोडप्याची केमिस्ट्री अनेकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.

Shaan-Radhika

Shaan-Radhika

2024 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत राधिकाने त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना, वर्षानुवर्षे त्यांचं प्रेम अधिकच वाढल्याचं सांगितलं होतं. शान आणि राधिका यांचं नातं पुढे लग्नात बदललं आणि नोव्हेंबर 2000 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. आज या दोघांना दोन मुलं आहेत.

Shaan-Radhika

Shaan-Radhika

शान आणि राधिका यांच्यासाठी करवा चौथही खास आहे. 2024 मध्ये दोघांनी त्यांच्या 25व्या करवा चौथबद्दल संवाद साधला होता. राधिकाने सांगितलं होतं की या दिवशी ती नववधूसारखी सजते, पूजा करते आणि पतीसाठी प्रार्थना करते. शान यांनीही पत्नीला साथ देण्यासाठी तिच्यासोबत उपवास करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं होतं.

Shaan-Radhika

Shaan-Radhika

गेल्या 25 वर्षांच्या वैवाहिक प्रवासानंतरही शान आणि राधिका यांच्यातील प्रेम आणि मैत्रीचा गोडवा कायम असल्याचं त्यांच्या सार्वजनिक पोस्ट आणि मुलाखतींमधून दिसून येतं. पडद्यावर किंवा मंचावर शान यांच्या आवाजावर लाखो चाहते फिदा असले, तरी त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास ‘सुर’ म्हणजे राधिका असल्याचं या दोघांच्या प्रवासातून दिसतं.

आणखी संबंधित बातम्या

Krantijyoti Savitribai Phule Child Care : गरजू बालकांच्या संगोपनासाठी दरमहा २,२५० रुपये; क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना

Krantijyoti Savitribai Phule Child Care : गरजू बालकांच्या संगोपनासाठी दरमहा २,२५० रुपये; क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना

Pune Gramin : 'संतोष शिंदे' यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून गौरव.!

Pune Gramin : 'संतोष शिंदे' यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून गौरव.!

Election Commission : व्हॉट्सॲपवर मतदारांची कागदपत्रे स्वीकारा.! राज्य निवडणूक आयोगाच्या बीएलओंना सूचना

Election Commission : व्हॉट्सॲपवर मतदारांची कागदपत्रे स्वीकारा.! राज्य निवडणूक आयोगाच्या बीएलओंना सूचना

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या नोटिशीला शाहरुख-अजयकडून एका वाक्यात उत्तर; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं ते विधान चर्चेत.!

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या नोटिशीला शाहरुख-अजयकडून एका वाक्यात उत्तर; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं ते विधान चर्चेत.!