Katrina Kaif : कतरिनाने विकीचीच जोडीदार म्हणून निवड का केली? केला मोठा खुलासा, काय म्हणाली पाहा…

Katrina Kaif : बॅालीवूड इडंस्ट्रीची बार्गी गर्ल कतरिना कैफ हिचा आज 42 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्ताने तिचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला शुभेच्छा देत आहेत. कतरिनाने एका मुलाखती दरम्यान विकी कौशल यालाच आपला जोडीदार म्हणून का निवडलं याचा मोठा खुलासा केला आहे.
कतरिनाने बॅालीवूडमध्ये दमदार एन्ट्री केली. खरंतर तिला इंडस्ट्रीमध्ये आणण्यात सलमान खानचा मोठा रोल होता अशा चर्चा सतत होत असतात. तिने अनेक हिट चित्रपट आजवर दिले आहेत, काही फ्लॅापही चित्रपट तिच्या नावावर आहेत. मात्र, तरीही कतरिनाचा एक मोठा चाहतावर्ग आहे. विकीसोबत लग्न बंधनात अडल्यानंतर कतरिनाच्या चाहत्यांना तिने विकीची निवड का केली असा प्रश्न पडला होता, याचं उत्तर तिने दिले आहे.
कतरिनाची सलमासोबतची निखळ मैत्रीच्या चर्चा नेहमी होत असतात. याशिवाय अभिनेता रणबीरसोबत तिच्या अफेअरच्या चर्चाही बीटाऊनमध्ये त्यावेळी केल्या जात होत्या. दोघांनीही काही चित्रपटात एकत्र कामही केले आहे. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटात दोघांनीही एकत्र काम केले आहे. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा जोर धरून लागल्या होत्या. दोघांचे बाहेर फिरतानाचे काही व्हिडीओ देखील समोर आले होते.
कतरिनाने एका मुलाखतीत सांगितलं आहे की ‘मी रणबीरच्या कुटुंबाच्या जास्त जवळ नव्हते. मी रणबीरसोबत सुद्धा जास्त काळ घालवू शकले नाही. माझा लग्नाबाबतच्या निर्णयात माझा कुटुंबाचा निर्णयही महत्त्वाचा होता. जर माझा नवरा मला सर्व गोष्टी देत असेल तर मी त्याच्यासाठी 100 टक्के देईल.’ असे तिने सांगितले.





