“६०० नॉट आऊट, ऑल टाइम ब्लॉक बस्टर”; विकी कौशलचे वडील भारावले; चाहत्यांचे मानले आभार

Vicky Kaushal Chhaava Movie | अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना स्टारर ‘छावा’ या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर लोकांच्या हृदयावरही विशेष छाप सोडली आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची कथा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे, ज्यांची भूमिका विकी कौशलने साकारली होती.
या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे देशभरातून मोठे कौतुक करण्यात आले. या चित्रपटाने ६०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विकीचे हे यश पाहून त्याचे वडील आणि प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर शाम कौशल भारावून गेले आहेत.
शाम कौशल यांनी ‘छावा’ चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टवर “६०० नॉट आऊट, ऑल टाइम ब्लॉक बस्टर. ‘पुष्पा २ हिंदी’, ‘स्त्री २’नंतर सर्वाधिक कमाई करणारा ‘छावा’ हा तिसरा चित्रपट ठरला”, असं लिहलेलं आहे. तर यासोबत शाम यांनी कॅप्शनमध्ये “इतके प्रेम दिल्याबद्दल देवाचे आणि सर्वांचे आभार”, असं म्हटलं. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. Vicky Kaushal Chhaava Movie |
View this post on Instagram
या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदान्नासह अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांसारख्या अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. दिनेश विजान यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केले आहे. Vicky Kaushal Chhaava Movie |
विकीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘छावा’नंतर तो संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या मोठ्या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय, विकी अमर कौशिक दिग्दर्शित ‘महावतार’ मध्ये देखील दिसणार आहे. Vicky Kaushal Chhaava Movie |
हेही वाचा:





