“बाबर क्रूर शासक, अकबर सहिष्णू तर औरंगजेब…” ; NCERT ने आठवीच्या पुस्तकात केले ‘हे’ मोठे बदल

NCERT। नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग च्या म्हणजेच एनसीईआरटीने आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात अनेक मोठे बदल केले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, एनसीईआरटीने नवीन अध्यायात बाबरला क्रूर शासक म्हणून वर्णन केले आहे. अकबर आणि औरंगजेब यांच्यावरील प्रकरणांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. एनसीईआरटीची नवीन पुस्तके सध्या बाजारात आली आहेत, परंतु त्यांनी अद्याप याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
एनसीईआरटीकडून आठवीच्या पुस्तकात बदल NCERT।
एनसीईआरटीने आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात बदल केले आहेत. आता हे पुस्तक दिल्ली सल्तनत आणि मुघल काळात धार्मिक असहिष्णुतेची उदाहरणे देते. अकबराचे वर्णन सहिष्णुता आणि क्रूरतेचे मिश्रण असे केले आहे. औरंगजेबाबाबत पुस्तकातही बदल करण्यात आले आहेत. औरंगजेबाचे वर्णन मंदिरे आणि गुरुद्वारांचा विध्वंसक असे केले आहे.
पुस्तकात बदल का केले ? NCERT।
सध्या एनसीईआरटीने कोणतेही उत्तर किंवा स्पष्टीकरण दिलेले नाही. हे बदल का केले गेले आहेत याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पुस्तकात एक विशेष टीप देखील जोडण्यात आली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, “भूतकाळातील घटनांसाठी आज कोणालाही दोषी ठरवू नये.”





