Battle of Galwan | बॉलीवूडचा दबंग अर्थात सलमान खान ‘बॅटल ऑफ गलवान’ या त्याच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमध्ये सलमानचा लुक खूपच दमदार आणि हिंसक दिसत आहे. सध्या त्याचा हा पोस्टर लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सलमान खानने त्याच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटातील लुकची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सलमानचा यापूर्वीचा ‘सिकंदर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकला नव्हता. त्यानंतर आता तो ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटात भारतातील एका युद्धाची कहाणी प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. सलमान खानसोबत या चित्रपटात अभिनेत्री चित्रांगदा सिंह देखील दिसणार आहे.
View this post on Instagram
‘बॅटल ऑफ गलवान’ ही कहाणी जून 2020 रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला त्यावर आधारित आहे. हे युद्ध पारंपरिक शस्त्रांऐवजी दगड, लाकडी काठ्या यांनी लढले गेले. कारण त्या भागात बंदुका वापरण्यावर बंदी होती. या संघर्षात भारताचे काही जवान शहीद झाले होते, ज्यात कर्नल संतोष बाबू यांचाही समावेश होता. Battle of Galwan |
सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या अपयशानंतर आता सगळ्यांच्या नजरा ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटावर खिळल्या आहेत. Battle of Galwan |