\n

नेमकं रवी किशन मीम स्टार कसे झाले?

\n

गेल्या काही महिन्यांत रवी किशन यांच्या अनेक मुलाखती, भाषणे, रिअॅलिटी शोमधील संवाद आणि स्टेजवरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांच्या सहज बोलण्याच्या शैलीतून अनेकदा शब्दांची गल्लत होते किंवा वेगळी वाक्यरचना तयार होते. हाच भाग मीम बनवणाऱ्यांसाठी मोठा विषय ठरला.

\n
\n

This is still ringing in my head 😭

\n

What have you done Ravi Kishan 🤣 pic.twitter.com/gdl0wXQEOp

\n

— Shilpak. (@ugach_kahitarii) July 30, 2026

\n

\n

काही सर्वाधिक चर्चेत राहिलेले संवाद :

\n

“Jaldi the Late” – संसद परिसरातील पत्रकारांशी बोलताना त्यांच्या तोंडून निघालेला हा संवाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

\n

“Home From Work” – “Work From Home” म्हणायचे असताना जीभ घसरल्याने त्यांनी “Home From Work” असे म्हटले. या एका वाक्यावर हजारो मीम्स तयार झाले.

\n

“आज आपला मौनव्रत आहे…” – एका पत्रकाराला ते म्हणाले, “आज आपला मौनव्रत आहे, चला आपण शांत राहूया.” बोलूनच मौनव्रत जाहीर केल्यामुळे हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला.

\n

NEET पेपरफुटीवरील प्रतिक्रिया देताना त्यांच्या शब्दोच्चाराचीही सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली.

\n

एका पॉडकास्टमध्ये त्यांनी म्हटलेले “शिवीगाळ करणे ही एक खूप सुंदर भावना आहे” हे वाक्यही रील्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरले गेले.

\n

उद्योजक आणि पॉडकास्टर राज शमानी यांच्या मुलाखतीत “प्रसिद्धी महत्त्वाची… पैसा माझ्या मागे येतो.., (‘पहचान, मनी फॉलोज माय ब्रदर’)” असे त्यांनी सहजपणे सांगितले. हा संवादही अनेक प्रेरणादायी आणि विनोदी व्हिडिओंमध्ये वापरला गेला.

\n
\n

ik ravi kishan is a great actor and allat but dude idk why whenever i see him, all i can think of is him dancing on “tohar lehenga utha de remote se” 😭 😭 😭 pic.twitter.com/GAkJtcPa7l

\n

— rick (@chickenalakiev) August 4, 2026

\n

\n

‘देशसेवा’ म्हणत रिअॅलिटी शोमधून घेतली एक्झिट :

\n

रवी किशन नुकतेच मुलगी रिव्हासोबत ‘अलायन्स’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. मात्र, राजकीय जबाबदाऱ्या आणि “देशाची सेवा करायची आहे…” असे सांगत त्यांनी अवघ्या एका दिवसात शो सोडण्याचा निर्णय घेतला.

\n

यानंतर ते विविध चित्रपट आणि मालिकांच्या प्रमोशनमध्ये दिसल्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा मीम्सचा पूर आला. “देशसेवा की प्रमोशन?” अशा कॅप्शनसह हजारो पोस्ट व्हायरल झाल्या.

\n
\n

50 shades of Ravi Kishan pic.twitter.com/AnKekedZO0

\n

— Naam Mein Kya Hai (@MithilaWaaaaala) August 4, 2026

\n

\n

मीम्सवर रवी किशन यांची प्रतिक्रिया काय?

\n

या वाढत्या लोकप्रियतेबद्दल विचारले असता रवी किशन यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. एका मुलाखतीत ते म्हणाले, “मी मुद्दाम काही करत नाही. जे काही घडतं ते पूर्णपणे नैसर्गिक असतं. लोकांना ते आवडतं, हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हा भगवान शिव आणि माता सरस्वती यांचा आशीर्वाद आहे.” असं त्यांनी सांगितलं.

\n

त्यांनी कधीही मीम्सवर राग व्यक्त केला नाही किंवा ट्रोलर्सवर टीका केली नाही. उलट, त्यांनी ही लोकप्रियता हसतमुखाने स्वीकारली. त्यामुळे सोशल मीडियावरील अनेक युजर्स त्यांचे कौतुक करताना दिसतात.

\n
\"ravi

ravi kishan

\n

रवी किशन यांचे फिल्मी करिअर

\n

अभिनेते रवी किशन हे उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे जन्मले. हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी मोठा संघर्ष केला. 1990 च्या दशकात त्यांनी बॉलिवूडमध्ये छोट्या भूमिका साकारत कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भोजपुरी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि अल्पावधीतच ते त्या इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक बनले.

\n

भोजपुरीसोबतच त्यांनी हिंदी, तेलुगू, कन्नड आणि काही तमिळ चित्रपटांमध्येही उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ‘तेरे नाम’, ‘लक’, ‘बुलेट राजा’, ‘बाटला हाऊस’, ‘मिशन राणीगंज’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.

\n

त्यांनी अनेक लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला असून, ‘बिग बॉस’ मधील त्यांच्या उपस्थितीमुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली.

\n

अभिनयासोबतच त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. आज ते अभिनय, राजकारण आणि सोशल मीडियावरील व्हायरल व्यक्तिमत्त्व अशा तिन्ही क्षेत्रांत चर्चेत असतात.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Ravi Kishan Viral Video : मनी फॉलोज माय ब्रदर..! सोशल मीडियावर रवी किशन यांचे व्हिडिओ इतके व्हायरल का होत आहेत? जाणून घ्या कारण…","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/DD-2026-08-06T173251.795.png","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/why-are-ravi-kishans-videos-going-so-viral-on-social-media-find-out-the-reason#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/DD-2026-08-06T173251.795.png","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/why-are-ravi-kishans-videos-going-so-viral-on-social-media-find-out-the-reason#webpage","name":"Ravi Kishan Viral Video : मनी फॉलोज माय ब्रदर..! सोशल मीडियावर रवी किशन यांचे व्हिडिओ इतके व्हायरल का होत आहेत? जाणून घ्या कारण…","url":"https://www.dainikprabhat.com/why-are-ravi-kishans-videos-going-so-viral-on-social-media-find-out-the-reason","inLanguage":"mr","description":"अभिनेते रवी किशन हे उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे जन्मले. हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी मोठा संघर्ष केला. 1990 च्या दशकात त्यांनी बॉलिवूडमध्ये छोट्या भूमिका साकारत कारकिर्दीची सुरुवात केली.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/why-are-ravi-kishans-videos-going-so-viral-on-social-media-find-out-the-reason#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/DD-2026-08-06T173251.795.png","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/why-are-ravi-kishans-videos-going-so-viral-on-social-media-find-out-the-reason#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/why-are-ravi-kishans-videos-going-so-viral-on-social-media-find-out-the-reason","name":"Ravi Kishan Viral Video : मनी फॉलोज माय ब्रदर..! सोशल मीडियावर रवी किशन यांचे व्हिडिओ इतके व्हायरल का होत आहेत? जाणून घ्या कारण…"}}]}}}

Ravi Kishan Viral Video : मनी फॉलोज माय ब्रदर..! सोशल मीडियावर रवी किशन यांचे व्हिडिओ इतके व्हायरल का होत आहेत? जाणून घ्या कारण…

अभिनेते रवी किशन हे उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे जन्मले. हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी मोठा संघर्ष केला. 1990 च्या दशकात त्यांनी बॉलिवूडमध्ये छोट्या भूमिका साकारत कारकिर्दीची सुरुवात केली.

Updated On:
Ravi Kishan Viral Video : मनी फॉलोज माय ब्रदर..! सोशल मीडियावर रवी किशन यांचे व्हिडिओ इतके व्हायरल का होत आहेत? जाणून घ्या कारण…

Ravi Kishan Viral Video : सोशल मीडियावर एखादा संवाद, एखादी चूक किंवा एखादी हटके स्टाईल कधी ट्रेंड होईल, याचा नेम नसतो. गेल्या काही आठवड्यांपासून इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स (ट्विटर) उघडल्यानंतर सर्वाधिक दिसणारा चेहरा म्हणजे अभिनेता आणि भाजप खासदार रवी किशन.

“Jaldi the Late”, “Home From Work”, “आज आपला मौनव्रत आहे…” अशा त्यांच्या संवादांनी इंटरनेट अक्षरशः गाजवले असून, हजारो रील्स, मीम्स आणि व्हिडिओंमध्ये त्यांची स्टाईल कॉपी केली जात आहे.

विशेष म्हणजे, इतर अनेक सेलिब्रिटींप्रमाणे ट्रोलिंगवर नाराजी व्यक्त करण्याऐवजी रवी किशन हे या सगळ्याकडे हसत-खेळत पाहतात. त्यामुळेच आज ते सोशल मीडियावरील ‘मीम किंग’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.

ravi kishan

ravi kishan

व्हायरल रिल आणि गाण्याची क्रेझ :

अलीकडेच रवी किशन यांचा एक व्हिडिओ अरूब खानच्या ‘Gucci’ या गाण्यावर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हेच गाणे त्यांची मुलगी रिव्हानेही आपल्या रिलमध्ये वापरले. आधीच या गाण्यावर हजारो मीम्स तयार होत असल्यामुळे रवी किशन आणि रिव्हाचा हा व्हिडिओ आणखी चर्चेत आला.

नेमकं रवी किशन मीम स्टार कसे झाले?

गेल्या काही महिन्यांत रवी किशन यांच्या अनेक मुलाखती, भाषणे, रिअॅलिटी शोमधील संवाद आणि स्टेजवरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांच्या सहज बोलण्याच्या शैलीतून अनेकदा शब्दांची गल्लत होते किंवा वेगळी वाक्यरचना तयार होते. हाच भाग मीम बनवणाऱ्यांसाठी मोठा विषय ठरला.

काही सर्वाधिक चर्चेत राहिलेले संवाद :

“Jaldi the Late” – संसद परिसरातील पत्रकारांशी बोलताना त्यांच्या तोंडून निघालेला हा संवाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

“Home From Work” – “Work From Home” म्हणायचे असताना जीभ घसरल्याने त्यांनी “Home From Work” असे म्हटले. या एका वाक्यावर हजारो मीम्स तयार झाले.

“आज आपला मौनव्रत आहे…” – एका पत्रकाराला ते म्हणाले, “आज आपला मौनव्रत आहे, चला आपण शांत राहूया.” बोलूनच मौनव्रत जाहीर केल्यामुळे हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला.

NEET पेपरफुटीवरील प्रतिक्रिया देताना त्यांच्या शब्दोच्चाराचीही सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली.

एका पॉडकास्टमध्ये त्यांनी म्हटलेले “शिवीगाळ करणे ही एक खूप सुंदर भावना आहे” हे वाक्यही रील्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरले गेले.

उद्योजक आणि पॉडकास्टर राज शमानी यांच्या मुलाखतीत “प्रसिद्धी महत्त्वाची… पैसा माझ्या मागे येतो.., (‘पहचान, मनी फॉलोज माय ब्रदर’)” असे त्यांनी सहजपणे सांगितले. हा संवादही अनेक प्रेरणादायी आणि विनोदी व्हिडिओंमध्ये वापरला गेला.

‘देशसेवा’ म्हणत रिअॅलिटी शोमधून घेतली एक्झिट :

रवी किशन नुकतेच मुलगी रिव्हासोबत ‘अलायन्स’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. मात्र, राजकीय जबाबदाऱ्या आणि “देशाची सेवा करायची आहे…” असे सांगत त्यांनी अवघ्या एका दिवसात शो सोडण्याचा निर्णय घेतला.

यानंतर ते विविध चित्रपट आणि मालिकांच्या प्रमोशनमध्ये दिसल्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा मीम्सचा पूर आला. “देशसेवा की प्रमोशन?” अशा कॅप्शनसह हजारो पोस्ट व्हायरल झाल्या.

मीम्सवर रवी किशन यांची प्रतिक्रिया काय?

या वाढत्या लोकप्रियतेबद्दल विचारले असता रवी किशन यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. एका मुलाखतीत ते म्हणाले, “मी मुद्दाम काही करत नाही. जे काही घडतं ते पूर्णपणे नैसर्गिक असतं. लोकांना ते आवडतं, हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हा भगवान शिव आणि माता सरस्वती यांचा आशीर्वाद आहे.” असं त्यांनी सांगितलं.

त्यांनी कधीही मीम्सवर राग व्यक्त केला नाही किंवा ट्रोलर्सवर टीका केली नाही. उलट, त्यांनी ही लोकप्रियता हसतमुखाने स्वीकारली. त्यामुळे सोशल मीडियावरील अनेक युजर्स त्यांचे कौतुक करताना दिसतात.

ravi kishan

ravi kishan

रवी किशन यांचे फिल्मी करिअर

अभिनेते रवी किशन हे उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे जन्मले. हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी मोठा संघर्ष केला. 1990 च्या दशकात त्यांनी बॉलिवूडमध्ये छोट्या भूमिका साकारत कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भोजपुरी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि अल्पावधीतच ते त्या इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक बनले.

भोजपुरीसोबतच त्यांनी हिंदी, तेलुगू, कन्नड आणि काही तमिळ चित्रपटांमध्येही उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ‘तेरे नाम’, ‘लक’, ‘बुलेट राजा’, ‘बाटला हाऊस’, ‘मिशन राणीगंज’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.

त्यांनी अनेक लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला असून, ‘बिग बॉस’ मधील त्यांच्या उपस्थितीमुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली.

अभिनयासोबतच त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. आज ते अभिनय, राजकारण आणि सोशल मीडियावरील व्हायरल व्यक्तिमत्त्व अशा तिन्ही क्षेत्रांत चर्चेत असतात.

आणखी संबंधित बातम्या

Usha Nadkarni : मी झोपेतच मेले तर.! उषा नाडकर्णींनी सांगितली मन हेलावून टाकणारी गोष्ट; मुलगा म्हणतो.. तू मला फक्त जन्म दिलाय

2026-08-06 18:53:25

Usha Nadkarni : मी झोपेतच मेले तर.! उषा नाडकर्णींनी सांगितली मन हेलावून टाकणारी गोष्ट; मुलगा म्हणतो.. तू मला फक्त जन्म दिलाय

Mark Zuckerberg : मार्क झुकरबर्ग यांनी मागितली भारत सरकारची माफी; वाचा नेमकं प्रकरण काय ?

2026-08-05 19:53:01

Mark Zuckerberg : मार्क झुकरबर्ग यांनी मागितली भारत सरकारची माफी; वाचा नेमकं प्रकरण काय ?

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरच्या ‘नागिन’ चित्रपटाची अपडेट समोर

2026-08-05 12:38:06

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरच्या ‘नागिन’ चित्रपटाची अपडेट समोर

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने परदेशातही जपली भारतीय संस्कृती, लेकीला शिकवला दुर्गामातेचा मंत्र

2026-08-05 11:05:10

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने परदेशातही जपली भारतीय संस्कृती, लेकीला शिकवला दुर्गामातेचा मंत्र

Genelia D'Souza: लग्नानंतर महिनाभरातच जेनेलिया का रडली? रितेश देशमुखच्या एका सल्ल्याने बदलला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन

2026-08-05 11:01:32

Genelia D'Souza: लग्नानंतर महिनाभरातच जेनेलिया का रडली? रितेश देशमुखच्या एका सल्ल्याने बदलला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन