Ayesha Khan : गोल्डन साडी, नथ अन् चंद्रकोर.! गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा खास मराठमोळा साज, लूक पाहून चाहते घायाळ
आयेशाने साडी, नथ आणि चंद्रकोर बिंदीचा असा काही सुंदर मिलाफ केला की, तिचे फोटो पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.

Ayesha Khan : ‘शरारत’ गाण्यातील आपल्या ग्लॅमरस आणि दमदार अंदाजाने देशभरातील चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री आयेशा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ना कोणता चित्रपट, ना कोणतं डान्स परफॉर्मन्स… तर अभिनेत्रीच्या नखरेल मराठमोळ्या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आयेशाने साडी, नथ आणि चंद्रकोर बिंदीचा असा काही सुंदर मिलाफ केला की, तिचे फोटो पाहून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत. पारंपरिक मराठी साज आणि ग्लॅमरस अंदाज यांचा सुरेख मेळ साधणारा तिचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
आयेशा खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. वेगवेगळ्या सण-उत्सवांच्या निमित्ताने ती खास लूकमध्ये फोटो शेअर करत असते. गणेश चतुर्थीनिमित्तही तिने खास मराठमोळा अंदाज निवडला.
अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या लूकमधील काही सुंदर फोटो शेअर केले असून, त्यासोबत “पदरात चांदणं, नजरेत स्वप्नं” असं मराठी कॅप्शन लिहिलं आहे.
आयेशाने या खास लूकसाठी सुंदर गोल्डन रंगाची साडी नेसली आहे. साडीला साजेसा मरून रंगाचा ब्लाउज तिने परिधान केला आहे. पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइलचा मेळ साधत तिने या लूकला ग्लॅमरस टच दिला आहे.
तिच्या लूकमधील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे मराठमोळी नथ आणि कपाळावरील चंद्रकोर बिंदी. यामुळे तिच्या चेहऱ्यावरील सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. केसांचा मेसी अंबाडा बांधून त्याला घुंगरांनी सजवत आ येशाने संपूर्ण लूक अधिक आकर्षक केला आहे.
तिच्या या फोटोशूटमध्ये पारंपरिक मराठी सौंदर्याची झलक दिसत असली, तरी तिच्या स्टाइलमध्ये आधुनिक ग्लॅमरही तितकाच जाणवतो. त्यामुळेच आयेशाचा हा लूक सोशल मीडिया युजर्सचं लक्ष वेधून घेत आहे.
‘मेरी मराठी मुलगी’ म्हणत चाहत्यांनी केलं कौतुक !
आयेशाने फोटो शेअर करताच तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरू केला. अनेकांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत तिच्या मराठमोळ्या लूकवर प्रेम व्यक्त केलं.
एका युजरने “इंस्टाग्रामवर आयेशापेक्षा सुंदर कोणीही नाही”, अशी कमेंट केली. तर दुसऱ्या युजरने “खूपच सुंदर” असं लिहिलं. आणखी एका चाहत्याने “मेरी मराठी मुलगी” अशी कमेंट करत अभिनेत्रीच्या मराठी लूकचं कौतुक केलं.
‘शरारत’मुळे मिळाली देशभरात ओळख…
आयेशा खानने ‘बिग बॉस 17’मध्ये सहभागी होत मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर तिच्या करिअरला आणखी वेग मिळाला. 2025 मध्ये ती ‘Dhurandhar’ चित्रपटातील ‘शरारत’ या लोकप्रिय गाण्यात क्रिस्टल डिसूझासोबत झळकली. या गाण्यातील तिच्या डान्स आणि ग्लॅमरस अंदाजाची मोठी चर्चा झाली.









