NCP News : राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; शरद पवार गटाने केली ‘ही’ प्रमुख मागणी

दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह सध्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे आहे. आज राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबात सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर या प्रकरणाची सुनावणी झाली नव्हती. शररद पवार यांच्या पक्षाच्या वतीने पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या पक्षाला देण्याच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या गटाने सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आज या प्रकरणावर सुनावणी होणार असल्याने सर्वांचे लक्ष या सुनावणीकडे लागलेले आहे.
शरद पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेत विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार हे प्रचारात शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरत असल्याचा युक्तीवाद शरद पवारांच्या वकिलांनी केला होता. त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि अजित पवार यांच्या पक्षाला चांगले यश मिळाले. दरम्यानच्या काळात या प्रकरणी कोणतीच सुनावणी झाली नव्हती. आता आज या प्रकरणाची सुनावणी न्यायापूर्ती सुर्यकांत यांच्या पीठासमोर पार पडणार आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हे नाव कायम ठेवण्यास कोर्टाने परवानगी दिली होती.
प्रकरण काय ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर या पक्षातील ४० हून अधिक आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्याकडे संख्याबळ अधिक असल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाले. या विरोधात शरद पवार गटाने सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २२ फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिले. यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र गटाने अजित पवार यांना दिलेले चिन्ह आणि पक्ष हा निवडणूक आयोगाचा निर्णय अन्याय असल्याचे म्हणत याचिका दाखल केली होती.





