उपराष्ट्रपती पदासाठी भाजप कोणाला देणार संधी? भाजपाच्या बैठकीपूर्वी संभाव्य नाव समोर

Vice President Election | उपराष्ट्रपती पदाचा जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी प्रकृतीचे कारण देत अचानक राजीनामा दिला होता. यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-विर्तक लावण्यात आले. यानंतर आता उपराष्ट्रपती पदासाठी 9 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी एनडीएकडून कोणाला संधी मिळणार यासाठी उमेदवाराच्या नावाबाबत रविवारी (17 ऑगस्ट) महत्त्वाची बैठक होणार आहे.
या बैठकीत उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचा उमेदवार निश्चित केला जाणार आहे. 7 ऑगस्टला संसदेत झालेल्या एनडीए नेत्यांच्या बैठकीत आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. आता भाजपाचे संसदीय मंडळ अधिकृत उमेदवार निश्चित करणार आहेत. याचदरम्यान आता भारतीय जनता पक्ष उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी कोणाला संधी देणार त्याबाबतची संभाव्य उमेदवारांची नावे समोर आली आहेत.
एका वृत्तानुसार, दिल्लीचे नायब राज्यपाल वीके सक्सेना, बिहारचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांची नावं आघाडीवर आहेत. याशिवाय गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, सिक्कीमचे राज्यपाल ओम माथूर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांची नावं देखील चर्चेत आहेत. Vice President Election |
राज्यपालांशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेषाद्री छारी, राज्यसभेचे उपाध्यक्ष जेडीयूचे नेते हरिवंश यांचं नाव आगामी बिहार विधानसभा निवडणुकीनिमित्त चर्चेत आहे. Vice President Election |
एनडीएच्या उमेदवाराचा विजय निश्चित
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार केवळ राज्यसभा आणि लोकसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या खासदारांना आहे. त्या सभागृहांमधील संख्याबळ विचारात घेता एनडीएच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातो. Vice President Election |
भाजपकडे लोकसभेत 240 आणि राज्यसभेत 102 खासदार आहेत. ससंदेतील एनडीएच्या पक्षांचं मिळून 457 खासदार सत्ताधाऱ्यांकडे आहेत. यामुळं एनडीएचे उमदेवार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवणार हे स्पष्ट आहे.
९ सप्टेंबरला निवडणूक
उपराष्ट्रपती पदाची रिक्त जागा भरण्यासाठी ९ सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट आहे. Vice President Election |
हेही वाचा
राहुल गांधींनी रणशिंग फुंकले! आजपासून सुरु करणार ‘व्होट अधिकार यात्रा’; तेजस्वी यादवही होणार सहभागी




