राहुल गांधींनी रणशिंग फुंकले! आजपासून सुरु करणार ‘व्होट अधिकार यात्रा’; तेजस्वी यादवही होणार सहभागी

Rahul Gandhi | लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवार (दि. १७) पासून सासराम येथून ‘व्होट अधिकार यात्रा’ सुरू करणार आहेत. ही यात्रा बिहारमधील मतदारांच्या यादीमध्ये दुरुस्तीविरूद्ध आणि मत चोरीविरूद्धचा लढा सबळ करण्यासाठी केली जात आहे.
ही यात्रा 17 ऑगस्टला सासराम, रोहतास येथून सुरू होईल आणि 16 दिवसांत 1300 किलोमीटर अंतर पार करेल. यात्रेत राहुल गांधी, तेजस्वी यादव आणि इंडिया ब्लॉकमधील इतर नेते सहभागी होतील.
राहुल गांधी यांनी एक्सवर प्रसारित केलेल्या ‘लापता व्होट’ या व्हिडीओत म्हटले आहे की, ‘आता कोणीही चोरी चोरी – चुपके चुपके काहीही गैरप्रकार करू शकणार नाही. जनता जागी झाली आहे. नागरिकांच्या मतांची चोरी म्हणजे त्यांच्या हक्कांचीच चोरी आहे. या विरोधात आवाज उठवू या.’ Rahul Gandhi |
कसे असणार यात्रेचे नियोजन?
- 17 ऑगस्ट: सासाराम, रोहतास
- 18 ऑगस्ट: देव रोड, अंबा-कुंडुंबा
- 19 ऑगस्ट: हनुमान मंदिर, पूनामा, वजीरगंज
- 21 ऑगस्ट: तीन मोहानी दुर्गा मंदिर, शेखपुरा
- 22 ऑगस्ट: चंद्र बाग चौक, मुंगेर
- 23 ऑगस्ट: कुर्सेला चौक, बरारी, कटिहार
- 24 ऑगस्ट: खुश्कीबाग, कटिहार ते पूर्णिया
- 26 ऑगस्ट: हुसैन चौक, सुपौल
- 27 ऑगस्ट: गंगवारा महावीर स्थान, दरभंगा
- 28 ऑगस्ट: रीगा रोड, सीतामढ़ी
- 29 ऑगस्ट: हरिवाटिका गांधी चौक, बेतिया
- 30 ऑगस्ट: एकमा चौक, एकमा विधानसभा, छपरा
- 01 सप्टेंबर: पटना येथे भव्य रॅलीसह यात्रेचा समारोप
- 20, 25 आणि 31 ऑगस्टला यात्रेला विश्रांतीसाठी थांबेल.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेअंतर्गत जाहीर केलेल्या मसुदा मतदारयाद्यांमधून बिहारमधील ६५ लाख मतदारांना मतदार यादीतून वगळले आहे. बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. याचदरम्यान आता बिहारमधून राहुल गांधी यांची ‘व्होटर अधिकार यात्रा सुरु होणार आहे.
दरम्यान, राहुल यांनी केलेले आरोप व मतदार यादी पुनरावलोकनाला विरोध या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग रविवारी पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणुक आयोगाकडून काय स्पष्टीकरण मिळणार याकडे अनेकांचे लक्ष राहणार आहे. Rahul Gandhi |
हेही वाचा :
Baramati News | इंदोरच्या धर्तीवर बारामतीचा विकास – उपमुख्यमंत्री अजित पवार





