रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिंदे आणि तटकरेंमध्ये दिल्लीत बैठक
Eknath Shinde And Sunil Tatkare | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदेंनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी महायुतीमधील विविध मुद्द्यांवर एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यासोबत चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे, रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी बसून प्रश्न सोडवण्याच्या सूचना अमित शाह यांनी दिल्या. शाह यांच्या या सूचनेनंतर सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातही दिल्लीत बैठक झाली. दोन्ही नेत्यांनी जवळपास ४० मिनिटे चर्चा केली. बैठक आटोपल्यानंतर तटकरे यांना भेटीविषयी विचारले असता, मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात ही बैठक होती, असे तटकरे म्हणाले. तर रायगडाच्या पालकमंत्री पदाबाबत तिढ्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.
नवीन पालकमंत्र्यांच्या हस्ते रायगडमध्ये झेंडावंदन होणार ?
15 ऑगस्टला नवीन पालकमंत्र्यांच्या हस्ते रायगडमध्ये झेंडावंदन होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेना शिंदे गटाकडे की राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाकडे जाणार, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. Eknath Shinde And Sunil Tatkare |
रायगड आणि नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून वाद
राज्य सरकारकडून जानेवारी 2025 मध्ये सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यात रायगडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे आणि नाशिकमधून भाजपचे गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रायगडमधून शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले आणि नाशिकमधून दादा भुसे हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. Eknath Shinde And Sunil Tatkare |
मात्र पालकमंत्री पद न मिळाल्याने भरत गोगावले आणि दादा भुसे यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर तातडीने रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. तेव्हापासून रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्रिपद रखडलं आहे. त्या संदर्भात एकनाथ शिंदे यांची दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक झाल्याची चर्चा आहे. Eknath Shinde And Sunil Tatkare |
हेही वाचा :
‘मी वाघीण आहे, मला जखमी करण्याचा प्रयत्न करू नका,…’ ; ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा





