‘मी वाघीण आहे, मला जखमी करण्याचा प्रयत्न करू नका,…’ ; ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा

Mamata Banerjee on BJP। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला (भाजप) आव्हान दिले आहे. याविषयी बोलताना त्यांनी, “तुम्ही मला तोपर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत मी तुम्हाला यासाठी परवानगी देत नाही.” असे म्हणत त्यांनी भाजपचे नाव न घेता टीका केली.
झारग्राममधील पंचमठा मोरे याठिकाणी एका जाहीर सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी,”ती एक वाघिणी आहे आणि कोणीही तिला जखमी करण्याचा प्रयत्न करू नये आणि तिला ‘धोकादायक’ बनवण्याचा धोका पत्करू नये.” असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना कमी लेखू नये असा इशारा देत तिचा लढा अजून संपलेला नसल्याचे म्हटले.
राजकारणातील पूर्वीच्या घटनांचा स्पष्ट उल्लेख करताना बॅनर्जी म्हणाल्या,”त्या कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) (सीपीआय-एम) गोळ्यांमधून वाचली. माझे डोके फुटले होते, माझे शरीर रक्ताने माखले होते. मला भीती वाटली नाही. मी एक जिवंत वाघीण आहे. मला जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, मी धोकादायक होईन.”असे म्हटले. बॅनर्जी यांनी पुढे बोलताना, “तुम्ही मला तोपर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत मी तुम्हाला यासाठी परवानगी देत नाही. ममता बॅनर्जींना पराभूत करणे सोपे नाही.”असे म्हणत विरोधकांना थेट आव्हान दिले.
ममता बॅनर्जी कशामुळे नाराज झाल्या? Mamata Banerjee on BJP।
ममता बॅनर्जी यांच्या आक्रमक विधानाचा अर्थ भाजपला आव्हान म्हणूनच घेतला जात आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या सरकारला दोन निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांसह (ईआरओ) चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिल्यानंतर बॅनर्जी यांचे हे विधान आले. यावर नाराजी व्यक्त करताना त्यांनी आयोगावर राजकीय पक्षपाताचा आरोप केला.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आयोग अमित शहा (केंद्रीय गृहमंत्री) यांच्या एजंटसारखे वागत आहे. ते अमित शाह यांच्या हातातील बाहुल्यासारखे वागत आहे. बंगाल हा अपमान सहन करणार नाही. मी माझ्या अधिकाऱ्यांना शिक्षा होऊ देणार नाही. जर तुमच्यात हिंमत असेल तर प्रयत्न करा!” तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांनी मतदारांना मतदार यादीतील त्यांची नावे तपासण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहनही केले. त्यांनी इशारा दिला, “मतदार यादीतील तुमचे नाव ही तुमची ओळख आहे. आत्ताच नोंदणी करा आणि नंतर पुन्हा तपासणी करा. निवडणुकीच्या दिवशी तुमचे नाव गहाळ झाल्याचे पाहून आश्चर्यचकित होऊ नका.”
आसाममधून बंगालला लोकांना धमकावण्यासाठी नोटिसा पाठवल्या
बॅनर्जींनी राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) बद्दलच्या त्यांच्या भीतीचा पुनरुच्चार करत, “लोकांना धमकावण्यासाठी आसाममधून बंगालला नोटिसा पाठवल्या जात आहेत. त्यांना अजिबात लाज वाटत नाही.” जंगलमहलमध्ये घालवलेल्या त्यांच्या काळाची आठवण करून देताना, बॅनर्जी यांनी १९९२ मध्ये बेलपहारी येथील त्यांच्या भेटीचा उल्लेख केला. बंगाली भाषिकांविरुद्ध पूर्वग्रह निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर टीका करताना त्या म्हणाल्या, “आता, जर तुम्ही बंगाली बोलता तर तुम्हाला बांगलादेशी किंवा रोहिंग्या म्हटले जाते. हा बंगाली भाषेवर हल्ला आहे.”असे म्हटले.
आम्ही लढल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही Mamata Banerjee on BJP।
बॅनर्जींनी लोकांना प्रतिकार करण्याचे आवाहन केले करत, “जय बांगला म्हणा”. निषेध करा. आम्ही लढल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. तुमचे मतदार कार्ड हे फक्त एक कार्ड नाही – ते तुमच्या ओळखीचा पुरावा आहे.”असे म्हटले. तसेच ‘मी पद सोडण्याचा निर्णय घेतला तरच तुम्ही मला काढून टाकू शकता. अन्यथा, तुमचे समर्थकही मला मतदान करतील.’असे म्हणत त्यांनी विरोधकांना डिवचले आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट संबोधित केले आणि त्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. याविषयी त्या म्हणाल्या, ‘तुम्ही जनतेसाठी काम करा. तुमचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. ते तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतील, पण यशस्वी होणार नाहीत. बंगाल निवडणुकीच्या नावाखाली मी छळ होऊ देणार नाही.’ मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजपचे ज्येष्ठ नेते राहुल सिन्हा म्हणाले की, ममता बॅनर्जी यांचे भाषण त्यांच्या असुरक्षिततेचे प्रतिबिंबित करते. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सिन्हा म्हणाले, ‘विरोधकांना मुंग्यांसारखे चिरडून टाकण्याची त्यांची धमकी दाखवते की त्या किती कमकुवत आणि हताश झाल्या आहेत.’





