न्यूझीलंडवरुन थेट पुण्यातील सिंहगडावर आलेला विदेशी पाहुणा आहे तरी कोण? वाचा त्याच्याबद्दल…

Pune | न्यूझीलंड येथून पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर एक पदेशी युट्युबर पाहुणा आला होता. यावेळी त्याला महाराष्ट्रातील काही तरुण भेटले. पाहुण्याचे स्वागत करावे, आदरातिथ्य करावे, त्याची विचारपूस करावी हे सोडून या टवाळखोर तरुणांनी भलताच प्रकार केला. या टोळक्यातील तरुणांनी परदेशी पर्यटक पाहुण्याला काही अश्लील मराठी शब्द सांगून त्या भाषेत शिवीगाळ करण्यास भाग पाडले.
सुरुवातीला त्यांच्या सांगण्यावरून त्याची नकळत शिवीगाळ केली. मात्र, आपण काहीतरी चुकीचं बोलत आहोत, याची जाणीव त्या पर्यटकाला झाली. या चीड आणणाऱ्या प्रकारानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळून आली होती. अखेर पोलिसांनी याची दखल घेत चौघांवर गुन्हा दाखल केला. आता या परदेशी पाहुण्याची माहिती समोर आली आहे. तो नक्की कोण आहे. याविषयी माहिती आहे.
परदेशी पाहुण्याची ओळख
परदेशी पाहुण्याचे नान कार्ल रॅाक आहे. तो न्यूझीलंडमधील एक यूट्यूबर आहे. ल्यूक द एक्सप्लोरर (@Lukethexplorer) हे त्याच्या यूट्यूब चॅनेलचे नाव आहे. या यूट्यूब चॅनेलवर त्याने आतापर्यंत भारतातील प्रवास आणि जीवनशैलीवर आधारित अनेक व्हडिओ बनवले आहेत. या सर्व व्हिडिओला चांगले व्हिज देखील आहेत.
तो २०१३ मध्ये पहिल्यांदा भारतात आला होता. त्याने भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना भेट दिली आहे. याशिवाय त्याने पाकिस्तान आणि बांगलादेशासारख्या शेजारील देशांमध्येही प्रवास केला आहे. त्याचे व्हिडिओ प्रामुख्याने परदेशी पर्यटकांसाठी टिप्स संस्कृतीविषयी समजून सांगणारे असतात. सध्या तो पुणे दौऱ्यावर आहे.
महाराष्ट्रातील संस्कृती पाहण्यासाठी आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक महाराष्ट्रात येत असतात. सिंहगड किल्ल्यावर देखील परदेशी पाहुणा छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमाची यशोगाथा पाहण्यासाठी म्हणून किल्ले सिंहगडावर आला होता. पण त्याच्यासोबत असभ्य वर्तन करुन त्याला मराठीत शिव्या देण्यास भाग पाडणाऱ्या टवाळखोरांमुळे माय मराठीची अस्मिता डागाळली आहे. महाराष्ट्राच्या अतिथी देव भव: संस्कृतीला तडा गेला आहे. या चीड आणणाऱ्या प्रकाराचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.





