पुणे जिल्हा | भोर मतदारसंघात रिपाइंचा कौल कोणाला ?

पौड (वार्ताहर)- रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महायुती सोबत घटक पक्ष म्हणून कार्यरत आहे. परंतु झालेल्या लोकसभेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकही जागा देण्यात आलेली नव्हती. तरी सुद्धा व रिपाइं व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पक्षाला साथ देऊन केंद्रात बहुमत मिळवून देण्यास खारीचा वाटा उचलला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून 288 जागा पैकी एकही जागा महायुतीने रिपाइंला सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्षामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. महायुतीमधून जागा मिळत नसल्याने पक्षाची फसवणूक करण्यात आलेली असल्याचे श्रीकांत कदम रिपाइंचे पुणे जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून भूमिका मांडण्यात आलेली आहे.
भोर विधानसभा मतदारसंघात भोर, मुळशी, राजगड (वेल्हा) या तालुक्यांतील असलेले रिपाइंचे मतदान निर्णायक होऊ शकते. त्यामुळे भोर मतदारसंघात पक्ष कोणाच्या बाजूने कौल देणार, याकडे आठवले गटाच्या कार्यकर्ते, मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.





