Who is Rhiya Ahir : कॉकरोचसाठी पोलिसांना एकटीच नडली ! ‘रिया अहीर’ नेमकी कोण आहे? वाचा….
Who Is Riya Yadav : रिया यादवचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. अनेकांनी तिच्या धैर्याचे कौतुक करत तिला ‘सुपरगर्ल’ म्हटले आहे. ‘एकटी मुलगी पोलिसांच्या संपूर्ण व्हॅनसमोर उभी राहिली

Who is Rhiya Ahir : दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीविरोधातील आंदोलनाची धग आता देशभर पोहोचताना दिसत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान मुंबईतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये एक तरुणी चक्क एका हाताने पोलिसांची व्हॅन रोखून धरताना दिसत आहे. तिच्या या धाडसाचे देशभरातून कौतुक होत असून, अनेकांनी या घटनेतून ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाची ताकद दिसून येत असल्याचे म्हटले आहे. (Who is Rhiya Ahir)
View this post on Instagram
हा व्हायरल व्हिडीओ मुंबईतील दादर परिसरातील शिवाजी पार्क येथील असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असतानाही नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. त्याचवेळी रिया अहीर नावाची तरुणी हुडी आणि कॅप घालून थेट पोलिसांच्या व्हॅनसमोर जाऊन उभी राहिली. (Who is Rhiya Ahir)
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! (Who is Rhiya Ahir)
व्हायरल व्हिडीओमध्ये रिया यादव पोलिसांच्या व्हॅनला पुढे जाण्यापासून रोखताना दिसत आहे. विशेष म्हणजे, एका हाताने तिने व्हॅनला धरून ठेवले असून, दुसऱ्या हातात तिचा मोबाईलही दिसत आहे. काही काळ ती पोलिसांची व्हॅन पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या काही आंदोलकांना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाल्याचे सांगितले जात आहे.
View this post on Instagram
या घटनेनंतर रिया यादवचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. अनेकांनी तिच्या धैर्याचे कौतुक करत तिला ‘सुपरगर्ल’ म्हटले आहे. ‘एकटी मुलगी पोलिसांच्या संपूर्ण व्हॅनसमोर उभी राहिली’, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. (Who Is Riya Yadav)
‘ते आपलं काम करत आहेत, पण जबाबदारीने करत नाहीत’ (Who is Rhiya Ahir)
व्हिडीओमध्ये रिया अहीर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करताना दिसते. “ते लोक आपलं काम करत आहेत, पण जबाबदारीने काम करत नाहीत. नागरिकांची जबाबदारीही त्यांचीच आहे,” असे ती म्हणताना दिसत आहे.
View this post on Instagram
रिया अहीरने आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर स्वतःला मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून नमूद केले आहे. तिचे इंस्टाग्रामवर जवळपास १ लाख फॉलोअर्स आहेत. ती ‘दिलबरा’ या प्रसिद्ध म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे. ती हाताने तयार केलेल्या कपड्यांचा व्यवसाय करते आणि ‘रियासत’ नावाचा स्वतःचा फॅशन ब्रँड चालवते. (Who Is Riya Yadav)
View this post on Instagram
आंदोलना दरम्यान ती पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी राहिल्याचा हा व्हिडीओ त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या एका विद्यार्थ्याने शूट केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. (Who Is Riya Yadav)





