Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची होणार चौकशी; जनहित याचिकेवर पार पडणार सुनावणी
स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टीने (Cockroach Janata Party) जंतर-मंतर येथे केलेल्या आंदोलनाची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर उद्या, शुक्रवारी सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे.

Cockroach Janata Party : स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टीने (Cockroach Janata Party) जंतर-मंतर येथे केलेल्या आंदोलनाची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर उद्या, शुक्रवारी सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे.
याचिकाकर्त्याच्या वकिलांनी मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर ही जनहित याचिका (Cockroach Janata Party) सादर केली. त्यानुसार दिल्ली उच्च न्याायलयाने याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिवक्ता बरुण कुमार सिन्हा यांनी जनहित याचिका दाखल करताना म्हटले की, हे प्रकरण एका तथाकथित विद्यार्थी आंदोलनाविरोधातील (Cockroach Janata Party) आहे. कारण आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण दिल्ली शहराला वेठीस धरले आहे. रस्ते अडवण्यात आले आहेत. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यावर मुख्य न्यायमूर्ती यांनी उद्या सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली आहे.
अखिल भारत हिंदू महासभेचे माजी उपाध्यक्ष सतीश कुमार अग्रवाल यांनी जनहित याचिकेत नमूद केले आहे की, राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांचा सहभाग तसेच परदेशातून निधी मिळणाऱ्या संस्थांचा कथित सहभाग यामुळे या आंदोलनाचे खरे स्वरूप, हेतू आणि उद्दिष्टे यांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सदस्य या आंदोलनात सहभागी झाले आहेत, त्यामुळे विद्यार्थी आंदोलन म्हणून दर्शवलेल्या या चळवळीचे रूपांतर आता राजकीय आंदोलनात झाले आहे, या गोष्टीकडे सतीश कुमार यांनी न्यायालयाचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला.
सतीश कुमार यांनी आरोप केला की, आंदोलनादरम्यान रुग्णवाहिकेसह इतर वाहतुकीत अडथळा आणला गेला. तसेच सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले. पत्रकारांवर हल्ले झाले, संसद भवनाजवळील सुरक्षा व्यवस्था भेदण्याचा प्रयत्न झाला. याशिवाय पोलीस कर्मचारी आणि इतर सरकारी अधिकारी जखमी झाले आहेत.
अशा परिस्थितीत एफआयआर दाखल करणे, आंदोलनाशी (Cockroach Janata Party) संबंधित घटनांची निष्पक्ष आणि सविस्तर चौकशी करणे आणि गरज वाटल्यास संबंधित कायद्यांनुसार राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या योग्य विशेष संस्थेकडून चौकशी करण्याचे निर्देश देण्याची त्यांनी विनंती केली आहे.






