SRH vs LSG : कोण आहे प्रिन्स यादव? ज्याच्या समोर ट्रॅव्हिस हेडने टेकले गुडघे, VIDEO होतोय व्हायरल

SRH vs LSG Prince Yadav who clean bowled Travis Head : प्रिन्स यादव हे नाव खूपच कमी लोकांना माहिती असेल पण आता जगाला या वेगवान गोलंदाजाबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे. कारण त्याने अशा फलंदाजाला बाद केले आहे, ज्याच्यासमोर सर्वोत्तम गोलंदाजांची लाईन-लेंथही खराब होते. हो, प्रिन्स यादवने आयपीएल २०२५ च्या ७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला बाद केले. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने ४७ धावा केल्या, त्याने ३ षटकार, ५ चौकार मारले पण प्रिन्सविरुद्ध त्याचे एकही फटके काम करत नव्हते आणि त्याने सपशेल शराणागती पत्करली. त्यामुळे ट्रॅव्हिस हेडला बाद करणारा प्रिन्स यादव कोण आहे? जाणून घेऊया.
नजफगडचा आहे प्रिन्स –
लखनौचा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव हा दिल्लीचा रहिवासी आहे. त्यांचा जन्म नजफगडच्या दरियापूर गावात झाला आणि त्यांनी टेनिस बॉलने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. यानंतर तो स्पोर्टिंग क्लबमध्ये सामील झाला आणि अमित वशिष्ठ यांनी त्याला प्रशिक्षण दिले. दरम्यान, दिल्लीचा वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवान आणि अष्टपैलू ललित लांबा यांनी प्रिन्स यादवला पुढे जाण्यास मदत केली. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवने दिल्ली प्रीमियर लीगद्वारे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली.
२०२४ च्या हंगामात, तो ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघ ओल्ड दिल्ली कडून खेळला, जिथे त्याच्या एकसारख्या अॅक्शनने चेंडूचा वेग बदलण्याच्या क्षमतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दहा सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्यानंतर, त्याला दिल्ली संघात व्हाईट-बॉल पदार्पण करण्याची संधी मिळाली, परंतु याआधी त्याने दोन रणजी ट्रॉफी सामने खेळले होते.
You miss, I hit 🎯
Prince Yadav gets the huge wicket of Travis Head as his maiden #TATAIPL dismissal 👏
Updates ▶ https://t.co/X6vyVEuZH1#SRHvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/VT3yLLlN9J
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2025
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही सोडली होती छाप –
प्रिन्सने २०२४-२५ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळला, जो आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाच्या फक्त एक दिवस आधी झाला होता. या सामन्यात, त्याने दिल्लीच्या एकतर्फी विजयात दोन मोठ्या विकेट्स (स्थापित नितीश राणा आणि समीर रिझवी) घेतल्या. दुसऱ्याच दिवशी, लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने त्याला ३० लाख रुपयांना खरेदी केले. त्याच्या पहिल्याच सय्यद मुश्ताक अली हंगामात, प्रिन्सने ७.५४ च्या इकॉनॉमी रेटने ११ विकेट्स घेतल्या आणि दिल्लीचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आणि संघाला उपांत्य फेरीत नेण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यानंतर तो ५० षटकांच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता, त्याने सहा सामन्यांमध्ये २२.०० च्या सरासरीने ११ विकेट्स घेतल्या. प्रिन्स यादवचा हा प्रवास दिल्लीच्या स्थानिक क्रिकेट लीगपासून सुरू झाला आणि आयपीएलपर्यंत पोहोचला. त्याच्या गोलंदाजीतील विविधता आणि सामन्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर विकेट घेण्याची क्षमता यामुळे तो खास बनला आहे. त्याने आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून आतापर्यंत फक्त दोन सामने खेळले आहेत आणि हेडला बाद करून त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.





