Bumrah Pandya Fitness : बुमराह-हार्दिक अन् प्रिन्स यादवच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट आली समोर! पाहा कोण कधी मैदानात परतणार?
Bumrah Pandya Fitness : हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि प्रिन्स यादव यांच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Jasprit Bumrah Hardik Pandya Fitness Updates Prince Yadav Fit : भारतीय क्रिकेट संघासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. जुलैच्या अखेरीस झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर पडलेला दिल्लीचा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव (Prince Yadav) आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. २४ वर्षीय प्रिन्सने बंगळुरू येथील रिहॅब पूर्ण केले असून तो आता निवडीसाठी उपलब्ध आहे. डीपीएल २०२६ (DPL 2026) मध्येही भेदक मारा करणारा प्रिन्स यादव आता ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या घरच्या टी-२० मालिकेसाठी संघात पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे.
जसप्रीत बुमराह सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये; पुनरागमनाची तारीख अनिश्चित!
दुसऱ्या बाजूला भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये आपले पुनर्वसन (Rehab) आणि प्रशिक्षण घेत आहेत. डाव्या पायाच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे बुमराह श्रीलंका दौऱ्यातील कसोटी मालिकेतून बाहेर झाला होता. तो सध्या हळूहळू स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असला, तरी मॅच वर्कलोड लक्षात घेता तो अजून पूर्णपणे सज्ज नाही. त्यामुळे मैदानावरील त्याच्या पुनरागमनाची कोणतीही निश्चित वेळ अद्याप ठरलेली नाही.
हार्दिक पंड्याच्या फिटनेसवर मेडिकल टीमचे बारकाईने लक्ष –
मांडीच्या आणि पाठीच्या दुखापतीनंतर स्नायूंच्या ताणातून सावरत असलेला हार्दिक पंड्याही बुमराहसोबत सीओएमध्ये घाम गाळत आहे. ऑगस्ट महिन्यापासून तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी उपलब्ध होईल असा अंदाज बांधला जात होता; मात्र बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या वर्कलोडवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे. हार्दिकच्या मॅच फिटनेसबाबत वैद्यकीय पथकाने अद्याप हिरवा कंदील दिलेला नसून त्याच्या संघात परतण्याबाबत सस्पेन्स कायम आहे.
निवडकर्त्यांचे वर्कलोड मॅनेजमेंटवर लक्ष; इंज्युरीमुळे बीसीसीआय सतर्क –
भारतीय निवड समिती अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिका तसेच भविष्यातील मोठ्या स्पर्धा लक्षात घेऊन खेळाडूंच्या फिटनेसला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. गेल्या काही काळात प्रमुख खेळाडू वारंवार दुखापतग्रस्त होत असल्याने सेंटर ऑफ एक्सलन्स आणि बीसीसीआयच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे बुमराह आणि हार्दिक यांच्या बाबतीत कोणतीही घाई न करता त्यांना पूर्ण तंदुरुस्तीनंतरच मैदानात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.





