Ajitesh Argal Umpire : विराट कोहलीचा तो ‘खास’ शिलेदार आता IPL मध्ये अंपायर! विश्वचषकाच्या फायनलमध्ये ठरला होता ‘मॅन ऑफ द मॅच’, पाहा कोण आहे?
Ajitesh Argal Umpire : २००८ च्या अंडर-१९ विश्वचषकात विराट कोहलीच्या खांद्याला खांदा लावून खेळणारा आणि भारताला विश्वविजेते बनवणारा एक 'हिरो' आता एका वेगळ्या भूमिकेत मैदानावर परतला आहे.

Ajitesh Argal IPL Umpire Debut : भारतीय क्रिकेटमध्ये खेळाडूंचे यश आणि संघर्ष या दोन्ही गोष्टी चाहत्यांना प्रेरणा देत असतात. २००८ च्या अंडर-१९ विश्वचषकात विराट कोहलीच्या खांद्याला खांदा लावून खेळणारा आणि भारताला विश्वविजेते बनवणारा एक ‘हिरो’ आता एका वेगळ्या भूमिकेत मैदानावर परतला आहे. तो खेळाडू म्हणजे अजितेश अर्गल, ज्याने नुकतेच आयपीएल २०२६ मध्ये पंच (अंपायर) म्हणून पदार्पण केले आहे.
आयपीएल २०२६ च्या ३२ व्या सामन्यात, अजितेश अर्गल राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामन्यात अंपायर म्हणून पदार्पण केले. त्याने २००८ च्या अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ षटकांत केवळ ७ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्ा आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्या ऐतिहासिक कामगिरीसाठी त्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
मैदानातील संघर्ष आणि सरकारी नोकरी –
Once Kohli’s U19 match-winner, Ajitesh Argal now calls the shots as IPL umpire https://t.co/kfAECMraPk pic.twitter.com/GrRWvPcGZO
— Gulf News (@gulf_news) April 23, 2026
विराट कोहली त्या संघाचा कर्णधार होता आणि पुढे तो जागतिक क्रिकेटचा सुपरस्टार बनला. मात्र, अजितेशचा प्रवास आव्हानात्मक राहिला. आयपीएलच्या पहिल्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला विकत घेतले, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. बडोद्याकडून खेळतानाही देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. अखेर क्रिकेटमध्ये करियर घडवणे कठीण वाटल्याने त्याने स्पोर्ट्स कोट्यातून आयकर विभागात (Income Tax Department) सरकारी नोकरी स्वीकारली.
क्रिकेटच्या प्रेमापोटी अंपायरिंगमध्ये पदार्पण –
Ajitesh Argal, a teammate of Virat Kohli in India’s victorious 2008 ICC Under-19WC squad, starred in the final with 2/7 and won Man of the Match. The former medium-pacer has now transitioned into umpiring, made his IPL debut on 22 April 2026 during the LSG vs RR match. 🙌 pic.twitter.com/fkepWtGEQj
— Cric666 (@Cric666official) April 23, 2026
अनेक वर्षे सरकारी नोकरी केल्यानंतरही अजितेशमधील क्रिकेटचे वेडेपण कमी झाले नव्हते. २०२३ मध्ये त्याने बीसीसीआयची कठीण अंपायरिंग परीक्षा उत्तीर्ण केली. देशांतर्गत क्रिकेट आणि महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) अनुभव घेतल्यानंतर, आता त्याने आयपीएलच्या मोठ्या मंचावर पदार्पण केले आहे. १० प्रथम श्रेणी सामने खेळणाऱ्या अजितेशने आता अंपायर म्हणून आपल्या आयुष्याची ‘दुसरी इनिंग’ दिमाखात सुरू केली आहे. एका खेळाडूचा अंपायरपर्यंतचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.





