वाढलेली दाढी,सोबत पोलीस आमिर खानचा व्हिडीओ पाहिला का ? नेटकरी म्हणतात,लाल सिंग चड्डामुळे…

मुंबई – अभिनेता आमिर खान इंडस्ट्रीमध्ये परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. वर्षाला एकच सिनेमा करत असला तरी आमिरचा सिनेमा म्हणजे ब्लॉकबस्टर सिनेमा ही खात्री प्रेक्षकांना असते. आमिर आपल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर खूपच मेहनत घेतो. नुकताच आमिरचा एका आगळावेगळा लूक समोर आला आहे. ज्यावरून आता चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या आईचे निधन झाले असता त्यांच्या अंत्य दर्शनासाठी आमिर पोहचला होता. यावेळी त्याचा नवा अवतार कॅमेऱ्यात कैद झाला. सोबत पोलीस,थकलेला चेहरा,पाढंरी दाढी,वाढलेले वजन आमिरचा असा लूक पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. व्हिडिओमध्ये आमिर एका सोसायटीमधून बाहेर येताना दिसत आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी या व्हिडीओवरून आमिरला जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिले की ‘आजोबा लूक छान आहे’. तर दुसऱ्याने लाल सिंग चड्डा फ्लॉप गेल्याने टेन्शन आलाय का ? असा सवाल विचारला आहे. तर काहींनी आमिर पुढच्या ब्लॉकबस्टरसाठी तयारी करत असलयाचे म्हंटले आहे.





