Sudhir Mungantiwar : सत्तेच ‘संगमरवरी’ स्मारक बांधताना मूळ विचारांची ‘कबर’ विसरू नका ; मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणाकडे ?

Sudhir Mungantiwar : राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर अनेक बड्या नेत्यांना डावलून इतरांना संधी देण्यात आल्याने अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा रंगू लागल्या होत्या. ज्या नेत्यांना मंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलं होतं त्यातलं एक म्हणजे मा. मंत्री सुधीर मुनगंटीवार. त्यांना भाजप मंत्रीमंडळात सहभागी करून घेऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवेल असे बोलले जात होते. मात्र, त्यांना मंत्री मंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यांना मंत्रीमंडळात स्थान न देण्याचे कारण लोकसभा निवडणुकीत त्यांचा झालेला पराजय असल्याची चर्चा आहे. आता परत एकदा त्यांनी एका मुलाखती दरम्यान मंत्रीपदाबाबत विधान करीत “ज्याला कोणाला माझं मंत्रीपद काढून घेण्यात आनंद वाटला असेल त्याला नंतर खंत वाटेल,” असे विधान मुनगंटीवार यांनी केले आहे.
युतीला लोकसभेला चांगले यश मिळाले नसले तरी विधानसभा निवडणुकीत उदुंग यश मिळाले. यात पुन्हा एकदा भाजपने घवघवीत यश मिळवत १३२ जागा जिंकून आणल्या. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले होते. मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न दिल्याने सविस्तर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, मला मंत्रिपद का मिळालं नाही याची निश्चित माहिती नाही. पण ज्याला कुणाला माझं मंत्रिपद काढून घेण्यात आनंद वाटला त्याला नंतर खंत वाटेल, असं काम करण्यासाठी मी मेहनत घेणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ते पुढे म्हणाले, सत्तेच संगमरवरी स्मारक बांधताना मूळ विचारांची कबर विसरू नये, असं देखील ते यावेळी बोलताना म्हणाले. यामुळे आता त्यांच्या या विधानाचा रोख कोणाकडे आहे याची चर्चा रंगू लागली आहे.
….म्हणून मी निवडणुकीत पुन्हा सक्रिय झालो
निवडणुकीत पहिल्यांदा पराभव झाल्यानंतर राजकारण सोडण्याचा विचार केला होता, पण प्रमोद महाजन यांच्यामुळे राजकारणात पुन्हा सक्रिय झालो असल्याची आठवण मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितली. हजारो गोड पाण्याच्या नद्या समुद्राला मिळतात, पण समुद्र गोड होत नाही. पण तरीही नद्या वाहायच्या थांबत नाहीत. समुद्राच्या पाण्याचे बाष्पिभवन होऊन गोड पाणी मिळतं, असं प्रमोद महाजन यांच्या वाक्याची आठवण त्यांनी बोलून दाखवली. त्यानंतर मी पुन्हा राजकारणात सक्रिय झालो, असे मुनगंटीवार म्हणाले.





