Sudhir Mungantiwar : आज बिहार राज्यातील विधानसभेसाठी निकालाच दिवस असल्याने महागठबंधन आणि एनडीएच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरूवात झाली असून दुपारनंतर बिहार राज्यात कोणाची सत्ता येईल हे स्पष्ट होईल, खरंतर सर्वच एक्सिट पोलमध्ये बिहार राज्यात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येईल, असे सांगण्यात आले आहे. या निवडणुकीत बिहारमध्ये २४३ विधानसभेच्या जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. अशातच आता महाराष्ट्र राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्ही या निवडणुकीत २४३ जागा लढतोय, मोठ्या संख्येने या सर्वच जागा आम्ही जिंकू, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना नायक चित्रपटातील हिरोपेक्षाही उत्तम काम मोदींच्या नेतृत्वात होत आहे, असे म्हटले आहे. तसेच आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, असे देखील मुनगंटीवार म्हणाले आहेत. बिहार राज्यातील निवडणुका महागंठबंधन आणि एनडीएने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. त्यामुळे मतदार राजा कोणाच्या पारड्यात बहुमत देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले? भारतीय जनता पार्टी व जेडीयू इतर मित्रपक्षांसोबत एनडीएचे सरकार बिहारमध्ये निश्चित येईल. ९० ते २००५ ज्यांनी जंगलराज बघितल्याने अंगावर काटे येईल. जगामध्ये असा जंगलराज नव्हता. औरंगजेबाच्या काळात जे व्हायचं तेच त्या जंगलराजमध्ये व्हायचं. कोणालाही रस्त्यावरून घेऊन जायचं, गाडी चोरी व्हायची. सातच्या नंतर तिथे फिरणे कठीण व्हायचं. सारे गुडं प्रवृत्तीचे लोक ज्यांना गुंड म्हणता येत नाही, गुंडाचे सरदार हे गाड्यांमध्ये बंदुका घेऊन निघायचे. त्यामुळे मला वाटतं कोणही मतदार अशा गुंड लफंगे लुच्च्यांच्या मागे उभा कधीच राहणार नाही, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे. विकासाचा विचार हाच २१ व्या शतकातला सर्वांगीन विकास महत्वाचा विचार आहे, असे देखील मुनगंटीवार यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, बिहारमध्ये मला विश्वास आहे आरजीडीएला मतदान व्हायचं दूरदूरपर्यंत प्रश्नच नाही. भाजपने बिहार विधानसभेसाठी १०१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावर किती उमेदवार भाजपचे निवडून येतील यावर उत्तर देताना, आम्ही एनडीए म्हणून लढतोय. भारतीय जनता पार्टी हा त्यामधला एक घटक आहे, पण आम्ही २४३ जागा लढतोय. मोठ्या संख्येने या जागा आम्ही जिंकू. नायक चित्रपटातील हिरोपेक्षाही उत्तम काम मोदींच्या नेतृत्वात होत आहे. आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल. हेही वाचा : Bihar Election Results 2025: “राज्यात नोकरदार तरुणांचे सरकार येणार” ; मतमोजणीपूर्वी तेजस्वी यादवांचे विधान