Ajit Pawar : ” मुलगी असो वा मुलगा, दोन वर थांबायला शिका!” लोकसंख्या वाढीवर अजित पवारांचं विधान

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी लोकसंख्या वाढीच्या मुद्यावर भाष्य करताना विधान केलं आहे. पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलना पवार यांनी वैयक्तिक अनुभवाचा उल्लेख करत लोकसंख्या वाढीसंदर्भात भाष्य केलं आहे.
मी एका भगिनीला विचारलं एक मुलगी इथे आहे दुसरी मुलगी कुठे आहे ? ती म्हणाली घरी ठेवली आहे, आई कडे दोन मुली असताना ती गरोदर दिसली. हे विचारल्यावर ती म्हणाली आहे पोटात… मी म्हणालो आता बास करा…मी विचारलं किती आहेत मुले? ती म्हणाली तीन आहेत. आता चौथे काय होईल माहिती नाही. आता तुम्ही मला सांगा वरून ब्रम्ह देव जरी आला लोकसंख्या वाढीचा कार्यक्रम आपण व्यवस्थेत पार पडायच ठरवलं तर तुम्ही पण सरकारमध्ये प्रमुख झाला तर ते अशक्य गोष्ट आहे, असं अजित पवार म्हणाले.
काळजी घेण्याचे केलं आवाहन
प्रत्येकानी आपल्या स्तरावर काळजी घेतली पाहिजे. कुणी चुकत असेल, तर त्याला सांगायला पाहिजे. अरे बाबा मुलगी असो किंवा मुलगा दोन वर थांबायला शिका, असा सल्ला अजित पवारांनी यावेळी बोलताना दिला. आम्ही सगळ्यांसाठी कायदा केला नाही, मात्र नगरपालिका, महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत इथपर्यंतचे कायदे केले आहेत.
लोक म्हणतात आम्हाला कायदा केला आहे, खासदार आमदारांना कायदा केला नाही, ते आमच्या हातात नाही, नाहीतर तिथे ही दोन अपत्याच्यावर अपत्ये असतील, तर त्याला उभे राहता येणार नाही. अशा पद्धतीचा कायदा केला असता, असं त्यांनी सांगितलं. पण ते आम्हाला जमले नाही. पुढे कधी हातात आले तर त्याचा विचार करू, असे देखील यावेळी बोलताना सांगितले.
हेही वाचा : “मी संसदेत शपथ घेतलीय, आयोगाने मला फक्त…” ; बेंगळुरूच्या रॅलीत राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल





