Maharashtra ZP Elections | राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून त्याची जोरदार तयारीही सुरू झाली आहे. मात्र अनेक इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म न मिळाल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे असे चित्र असताना याच गोंधळात आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रलंबित जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत भाष्य केले आहे. महापालिकांनंतर कुठल्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होतील, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. कोरेगाव-भीमा येथील 208 व्या शौर्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार अभिवादन करण्यासाठी आले होते. त्याचवेळी जिल्हा परिषदेची आचारसंहिता लवकरच लागणार असल्याचे मोठे वक्तव्य अजितदादांनी केले. अजित पवार नेमकं काय म्हणाले? “जिल्हा परिषदेची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे कुठली अडचण निर्माण होईल ती होता कामा नये. निवडणुका जाहीर करण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. निवडणूक आयोग त्याबाबतचा निर्णय घेईल. विदर्भातील जिल्हा परिषद उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कोकणातील जिल्हा परिषद पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद आहेत. ते आरक्षण 50 टक्के पर्यंतच घ्या, अशा सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. त्यानुसार 50% च्या आत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील, असे अजित पवार म्हणाले. तसेच पुणे पिंपरी चिंचवड मध्ये शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित लढणार त्याबाबत आज उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले. दोन टप्प्यात जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकासारखेच राज्यात दोन टप्प्यात जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या पेचामुळे झेडपीच्या आधी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. अखेरच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ६ ते ८ जानेवारीच्या दरम्यान आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. तर २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ३१ जानेवारीनंतर होतील असेही म्हंटले जात आहे. त्यानुसार ८ जानेवारीच्या आत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच शक्यता आहे. Maharashtra ZP Elections | हेही वाचा: भाजपच्या बड्या नेत्याचे वादग्रस्त विधान; उदय सामंतांनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया देत विषयचं संपवला म्हणाले…