Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना डिस्चार्ज कधी मिळणार? मोठी अपडेट समोर, डॅाक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला
Eknath Shinde : त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर आणि कुटुंबीयांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आणि अशक्तपणाचा त्रास जाणवल्याने शनिवारी रात्री ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी डॉक्टरांनी त्यांना आणखी एक दिवस विश्रांतीचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे शिंदे सोमवारीही रुग्णालयातच राहण्याची शक्यता असून, मंगळवारी त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांतील सततच्या धावपळीमुळे आणि कामाच्या ताणामुळे एकनाथ शिंदे यांना तापासह तीव्र अशक्तपणा जाणवत होता. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर आणि कुटुंबीयांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा : Electricity Bill: वीज बिल थेट दुप्पट! मे महिन्याच्या बिलाने उडवली पुणेकरांची झोप; पाहा काय आहे कारण
सध्या त्यांना आरामाची गरज : प्रकाश आबिटकर
दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पंढरपुरात माध्यमांशी बोलताना सांगितले की, “शिंदे साहेबांना सततच्या धावपळीचा त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. ते कामात इतके व्यस्त असतात की स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. सध्या त्यांना आरामाची गरज आहे.”
आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे : बच्चू कडू
शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनीही एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीचा उल्लेख केला. ते म्हणाले, “शिंदे साहेब दिवस-रात्र कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असतात. रात्री उशिरापर्यंत ते लोकांच्या भेटीगाठी घेतात. एवढा मोठा जनसंपर्क ठेवताना त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांनी लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू व्हावे, अशी आम्ही प्रार्थना करतो.”
भूंकप नाही तर महाभूंकप : संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य
सध्या एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष असून, आवश्यक तपासण्या आणि उपचार सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे अॅापरेशन ३.० ची चर्चा असून लवकरच राज्यात मोठा राजकीय भूंकप नाही तर महाभूंकप होणार असल्याचं सर्वात मोठं वक्तव्य शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यामुळे या संभाव्य महाभूंकपाची वेळ नेमकी कधी येणार याविषयी विविध चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
हेही वाचा : PMC News: माननियांच्या उपचाराचा खर्च १० कोटींवर! नवीन निर्णयाने पालिकेच्या खर्चात दुपटीने वाढ होणार






