Pune : धंगेकरांच्या मनात चाललयं तरी काय? डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात भगवा गमचा; शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची रंगलीय चर्चा

पुणेः शहरातील काँग्रेस पक्षात मोठा राजकीय भूंकप होणार असल्याची चर्चा केली जात आहे. नुकतीच महादेव बाबार आणि कसब्याचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीनंतर आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे धंगेकर भविष्यात आपल्या हाती धनुष्यबाण घेणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
रविंद्र धंगेकर यांचे व्हॅाट्सअॅप स्टेटसमधील फोटो लक्ष वेधून घेत आहे. तसेच धंगेकरांनी त्यांच्या एक्स खात्यावरील प्रोफाइल फोटोची देखील चर्चा केली जात आहे. या फोटोत धंगेकर यांनी डोक्यावर भगवी टोपी घातली आहे. तसेच गळ्यात भगव्या रंगाचा गमाचा परिधान केल्याचे दिसत आहे. हे नाव पुन्हा ऐकण्याची तयार ठेवा # रविंद्र धंगेकर असे लिहिले आहे. यामुळे धंगेकरांच्या मनात नक्की चाललयं तरी काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
काँग्रेस नेते मा.आ. रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
@DhangekarINC pic.twitter.com/3MGNhkZCGu— Uday Samant (@samant_uday) February 22, 2025
…तर आम्हाला आनंदच होईल
अशातच आता शिवसेनेचे मंत्री उदय सामंत ज्यांच्याकडे टॅायगर अॅापरेशनची जबाबदारी सोपण्यात आल्याचे सांगितले जाते आहे. त्यांनी याविषयी भाष्य केले आहे. मला असं वाटतं की रवींद्र धंगेकरांनी गळ्यात जर भगवं उपरणं ठेवलं असेल आणि त्यावर जर भविष्यात धनुष्यबाण आला तर आम्हाला सर्वांना आनंदच होईल, असे सामंत म्हणाले आहेत. मी कालच रवींद्र धंगेकर यांना निमंत्रण दिलं की, त्यांच्यासारखा सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला जर ताकदीने सामाजिक काम करायचं असेल तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने शिवाय पर्याय नाही, असे म्हणत सामंतांनी धंगेकरांना एकप्रकारे पक्षात येण्याची अॅाफरच देऊन टाकली आहे.
अॅाफर देणं चुकीचे नाही
त्यांच्या या अॅाफरवर माजी आमदार रविंद्र धंगेकरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांना वाटतं असेल की, आपला मित्र जवळ असला पाहिजे. कोणालाही तसं वाटतं. माझा स्वभाव चांगला आहे. त्यामुळे ऑफर देणं काही चुकीचे नाही, असे सूचक विधान रविंद्र धंगेकरांनी केले आहे. यामुळे भविष्यात धंगेकरांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण प्राप्त झाले आहे.





